
पंजाबमधील स्वयंघोषित 'मेरा येशु येशु' फेम पाद्री बजिंदर सिंग यांना मोहाली कोर्टाने २०१८ च्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बजिंदर सिंग जालंधरमधील ताजपूर येथे द चर्च ऑफ ग्लोरी अँड विस्डम आणि मोहालीतील माजरी येथे दोन चर्च चालवतात आणि स्वतःला "प्रेषित बजिंदर" म्हणवतात.