

Modi and Shah Launch Barrage of Attacks; Tejaswi Yadav Hits Back in Bihar Polls
Sakal
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणमैदानामध्ये सत्ताधारी- विरोधकांमध्ये आज जोरदार प्रचारयुद्ध रंगले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ समस्तीपूर आणि बेगुसरायमध्ये धडाडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिवान आणि बक्सरमध्ये सभा पार पडल्या. ‘‘जामिनावर तुरुंगाबाहेर असलेल्यांवर लोक पुन्हा विश्वास ठेवत नाहीत,’’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी यादव कुटुंबीयांना धारेवर धरले तर गृहमंत्री शहांनी सिवान येथील सभेत सर्व घुसखोरांना बिहारमधून हाकलून देण्यात येईल, अशी घोषणा केली. विरोधी महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांची सहरसा जिल्ह्यातील सिमरी बख्तियारपूर येथे सभा पार पडली. ‘‘राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आले तरीसुद्धा नितीशकुमार हे मुख्यमंत्री होणार नाहीत,’’ अशी टीका त्यांनी केली.