पाटणा : बिहारमधील चंदन मिश्रा हत्याकांडात आरोपी तौसिफ बादशाहनं (Tausif Badshah) चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती दिली आहे. त्यानं उघड केलं, की हल्ल्यात वापरलेली शस्त्रे बक्सर येथून आणण्यात आली होती आणि पाच शूटरनी मिळून रुग्णालयात चंदन मिश्रा याच्यावर तब्बल २८ गोळ्या झाडल्या.