esakal | चुकीच्या रीतीने कापले महिलेचे केस; ग्राहकमंचाकडून दोन कोटींचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

चुकीच्या रीतीने कापले महिलेचे केस; ग्राहकमंचाकडून दोन कोटींचा दंड

चुकीच्या रीतीने कापले महिलेचे केस; ग्राहकमंचाकडून दोन कोटींचा दंड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : एका महिलेचे लांब केस कापणे आणि चुकीचे उपचार केल्याप्रकरणी दिल्लीच्या ग्राहक मंचाने एका नामांकित हॉटेलला दोन कोटी रुपये भरपाई देण्याचा आदेश दिले. आशना रॉय असे महिलेचे नाव असून संबंधित हॉटेलमधील सलूनमध्ये तिचे लांब केस कापले आणि चुकीच्या रीतीने केसांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे तिचे मोठे नुकसान झाले आणि जीवनशैली बिघडली. टॉप मॉडेल होण्याचे तिचे स्वप्न भंगले. याप्रकरणी तिने २०१८ रोजी ग्राहक मंचात दावा ठोकला आणि यावर दोन दिवसांपूर्वी निकाल देण्यात आला.

हेही वाचा: UPSCचा निकाल जाहीर; शुभम कुमार देशात अव्वल; 761 जणांची नियुक्ती

ग्राहक मंचाच्या एका पीठाचे अध्यक्ष आर.के. अग्रवाल आणि सदस्य एस.एम.कांतिकर यांनी निकाल देत याचिकाकर्त्या महिलेला दोन कोटींची भरपाई देण्याचे आदेश दिले. निकालात म्हटले की, महिला आपल्या केसाविषयी खूपच संवेदनशील असतात. केसांची निगा राखण्यासाठी त्या खूप पैसा खर्च करत असतात आणि एकप्रकारे त्यांचे केसांशी भावनिक नाते असते. न्यायालयाने म्हटले की, आशना रॉय या आपल्या लांब केसामुळे हेअर प्रॉडक्टसाठी मॉडेलिंग करत. याशिवाय अनेक मोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करत असत. परंतु हॉटेलमधील सलूनने तिने दिलेल्या सूचनांच्या विरुद्ध केशरचना केली. तिचे केस कापले. त्यामुळे तिच्या हातातून मोठे प्रकल्प निसटले आणि नुकसान सहन करावे लागले. तिला मानसिक धक्का बसला आणि नोकरी देखील गेली.

हेही वाचा: 'अशा' पद्धतीने सुरु होत आहेत राज्यातील शाळा: वर्षा गायकवाड

चूक लपविण्याचा प्रयत्न

अर्जदार महिलेने हॉटेलवर केवळ चुकीच्या रीतीने केस कापल्याबद्दलच नाही तर हेअर ट्रिटमेटमध्ये देखील निष्काळजीपणा दाखवला आहे, असा आरोप केला आहे. न्यायालयाने म्हटले, उपचारादरम्यान तिची टाळू भाजली आणि आताही तिला ॲलर्जीचा आणि खाज सुटण्याचा त्रास होत आहे. अर्थात महिलेने हॉटेल व्यवस्थापनाशी केलेल्या व्हॉटसअप चॅटिंगवरून हॉटेलने चूक मान्य केल्याचे निष्पन्न होते. तसेच मोफत उपचार करण्याचे आमिष दाखवून हॉटेलने चूक लपविण्याचा प्रयत्न केला होता. पीडित महिलेस दोन महिन्यांत भरपाई द्यावी, असा आदेश दिला.

loading image
go to top