Mehbooba Mufti | UP निवडणुकांच्या नावाखाली देशात ध्रुवीकरण, मुफ्तींची मोदींवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mehbooba Mufti

UP निवडणुकांच्या नावाखाली देशात ध्रुवीकरण, मुफ्तींची मोदींवर टीका

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भारतीय जनता पक्षावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकांचे ध्रुवीकरण केल्याचा आरोप केला.

हे सरकार दहशतवादाच्या नावाखाली नागरिकांची हत्या करत असल्याने मी निषेध करत आहे. अतिरेकी मारले जात आहेत का हे कोणालाच माहीत नाही, असं त्या म्हणाल्या. नुकताच तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह कुटुंबीयांना देण्यास सरकारने नकार दिल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे.

सहा दिवसांच्या जम्मू दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाच्या मुख्यालयात पीडीपी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मेहबुबा म्हणाल्या, "तरुणांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी, ज्याचे निराकरण करण्यात सध्याचे सरकार अपयशी ठरलं आहे. वर्षभराहून अधिक काळ शेतकरी आंदोलन करत आहेत, मात्र त्यांचे ऐकून घेणारे कोणी नाही.

उलट हिंदू-मुस्लिमच्या नावाखाली लोकांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केलाय. या सरकारला फक्त त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून सुरू झालेल्या हिंदू-मुस्लीम राजकारणाची माहिती आहे. मते मिळवण्यासाठी या सरकारची ही योजना आहे, असं त्या म्हणाल्या.

जम्मूमध्ये एका हिंदूंच्या घरात मुफ्ती कशा वाढल्या. पण हिंदू आणि मुस्लीम यांच्यात कधीच फरक जाणवला नाही, असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे लहानपणीच्या काही आठवणी शेअर केल्या.

loading image
go to top