esakal | Covishield भारतात सर्वात महाग; जाणून घ्या इतर देशातील किंमत

बोलून बातमी शोधा

covishield

150 रुपये प्रति डोस लस विकल्यानंतरही फायदा होईल.

Covishield भारतात सर्वात महाग; जाणून घ्या इतर देशातील किंमत
sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिम वेगाने राबवली जात आहे. सोमवारी 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. कोरोना प्रतिबंधक लस कोविशील्डचं उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं (SII) आपल्या लसीची किंमत जाहीर केली आहे. त्यानुसार, खासगी रुग्णालयांसाठी एका लसीच्या डोसाची किंमत ६०० रुपयांत देण्याचा निर्णय सीरमने गेल्या आठवड्यात घेतला होता. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी आणि एस्ट्रोजेनेकाद्वारा तयार करण्यात आलेल्या कोविशील्ड लशीची किंमत इतर देशाच्या तुलनेत भारतांमध्ये सर्वाधिक असू शकते. कोविशील्डचं भारतात सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असून कंपनीचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले होते की, 150 रुपये प्रति डोस लस विकल्यानंतरही फायदा होईल.

सीरम इन्स्टिट्यूटनं बुधवारी राज्य, केंद्र आणि खासगी रुग्णालयासाठी लशींच्या किंमती जाहीर केल्या. यामध्ये खासगी रुग्णालयासाठी 600 रुपये प्रति डोस अशी किंमत ठेवण्यात आली. राज्य सरकारच्या रुग्णालयांना 400 आणि केंद्र सरकारच्या रुग्णांलयाना 150 रुपयांत लशीचे डोस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारसोबतचा सध्याचा करार रद्द झाल्यानंतर 400 रुपये प्रति डोस अशा किंमतीत लस दिली जाणार असल्याचेही कंपनीनं स्पष्ट केलेय. सीरमच्या उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के लस केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेसाठी (18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण) देण्यात येणार आहे तर उर्वरित ५० टक्के लस या राज्यांना आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येणार आहे. अधिकृत निवेदनाद्वारे सीरमने हे जाहीर केलं.

हेही वाचा: 'कोविशील्ड' लसीमुळे रक्तात गुठळ्या? खबरदारी म्हणून आयर्लंडमध्येही लसीकरणास ब्रेक

द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, सीरम इन्स्टिट्यूटनं खासगी रुग्णालयाला 600 रुपयांना (8 डॉलर)दिलेली कोविशील्ड लस जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात महाग आहे. राज्य सरकार लसीचा खर्च उचलण्यास तयार नसेल तर रुग्णांना प्रति डोस 400 रुपये (5.30 डॉलरपेक्षा जास्त) मोजावे लागतील. लशीची ही किंमत अमेरिका, युके आणि युरोप तसेच इतर देशांना मिळणाऱ्या कोविशील्ड लशीपेक्षा जास्त आहे. कोविशील्डच्या वाढवलेल्या किंमतीबाबत केंद्र सरकार सहमत होतं का? याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर सीरम, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यावर उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा: Big Breaking: 18 वर्षांवरील सर्वांना देणार कोरोना लस

यूरोपियन देशात प्रति डोस किंमत 2.15-3.50 डॉलर

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत (SII) करार झालेल्या देशापैकी सर्वाधिक किंमत भारतात आहे. बांग्लादेश, साऊदी अरब आणि साउथ अफ्रीकासारख्या देशातही कोविशील्डची किंमत भारतापेक्षा कमी आहे. यामधील अनेक देशांनी मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारा (SII) भारतात सध्या दोन लशीचं उत्पादन होत आहे. यामध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ यांचा समावेश आहे. केंद्र सरकारला जुन्या किंमतीनुसार 150 रुपयांप्रमाणे लशीचा पुरवठा केला जाणार आहे. यूरोपियन देशात विविध ठिकाणी लसीच्या किंमती वेगवेगळ्या आहेत. एका डोससाठी जवळपास 2.15-3.50 डॉलर इतकी किंमत आहे. ब्रिटिश मेडिकल जर्नलनुसार, यूकेमध्ये एस्ट्राजेनेकाची कोविशील्ड लस प्रति डोस 3 डॉलर (जवळपास225 रुपये) आणि अमेरिकेत प्रति डोस 4 डॉलरला (जवळपास 300 रुपये) मिळत आहे. अमेरिका आणि यूएस या देशात लशीची किंमत थेट एस्ट्राजेनेकाला केली जात आहे. दुसरीकडे ब्राजील इचक मॅन्युफॅक्चरर्सकडून कोविशील्ड 3.15 डॉलरमध्ये विकत घेत आहे.

हेही वाचा: 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लस; रजिस्ट्रेशन कसं करायचं?

बांग्लादेशला फक्त 4 डॉलरला -

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) बांगलादेशला प्रति डोस 4 डॉलर किंमतीत लस पुरवत आहे. बीबीसीनं ढाका येथील आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, इतर शुल्क धरुन बांगलादेशला लशीचा एक डोस 5 डॉलरला मिळत आहे. दक्षिण आफ्रिका आणि साऊदी अरबनं सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) लशीच्या एका डोससाठी 5.25 डॉलर मोजले आहेत. भारतातील राज्याला दिल्या जाणाऱ्या किंमतीपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा: 'सीरम'कडून लशीची किंमत जाहीर; सरकारी आणि खासगी रुग्णालयांसाठी वेगळा दर

कंपनीचा दावा, परदेशी लशींच्या तुलनेत कोविशिल्ड स्वस्त

सीरमने आपल्या निवदेनात म्हटलं की, भारत सरकारच्या निर्देशांनंतर आम्ही कोविशील्ड लसीच्या किंमतींची घोषणा करत आहोत. त्यानुसार, राज्य सरकारांसाठी या लसीची किंमत ४०० रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये प्रतिडोस असेल. परदेशी लसींच्या तुलनेत कोविशिल्ड लस खूपच स्वस्त असल्याचंही सीरमनं म्हटलं आहे. त्यानुसार, अमेरिकन लसीची किंमत १५०० रुपये प्रतिडोस, रशियन लस प्रतिडोस ७५० रुपये तर चीनी लस प्रतिडोस ७५० रुपये असल्याचं सीरमने आपल्या निवेदनातून स्पष्ट केलं आहे.