बापरे पैसेच पैसे! गायिकेवर केली पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे पैसेच पैसे! गायिकेवर केली पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल
बापरे पैसेच पैसे! गायिकेवर केली पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

बापरे पैसेच पैसे! गायिकेवर केली पैशांची उधळण, व्हिडिओ व्हायरल

तुमची कला आवडली तर लोकं प्रशंसा करतात. चार शब्द तुमच्याविषयी चांगले सांगून लोकांना ती कला पाहण्यासाठी आग्रह धरतात. गाण्याबाबत म्हणाल तर कुठल्याही संगीत मैफिलीत गाणे आवडले की लोकं ते पुन्हा म्हणण्याची फर्माईश करतात. पण एका गायिकेचं गाणं आवडत म्हणून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर चक्क पैशांची उधळण केलीय. त्या गायिकेने तो व्हिडिओ सोशल मिडियावर टाकल्यावर तो व्हायरल झाला आहे.

उर्वशी रादादिया असे या गायिकेेचे नाव आहे. ती अहमदाबाद येथील प्रसिद्ध लोकगायिका आहे. 4 दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती गात असताना काहीजण पैशांनी भरलेल्या पिंपातले पैसे तिच्यावर उधळत असल्याचे पाहायला मिळते. तसेच इतरही अनेकजण ती गात असताना पैसे फेकत असतात. स्टेजवर सगळीकडे पैसेच पैसे दिसतात. एवढे पैसे बघून साहजिकच आश्चर्य वाटते. माहितीनुसार, तिच्या प्रत्येक लाईव्ह शोमध्ये तिच्या गाण्यांना ही प्रतिक्रिया मिळते. उर्वशी यांच्यासाठी ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. उर्वशी या जमा झालेल्या पैशांचा वापर गरीब मुलींच्या विवाह आणि इतर चांगल्या गोष्टींसाठी करते.

loading image
go to top