'भगवे वस्त्र घालून लोक मंदिरांमध्ये बलात्कार करत आहेत'

वृत्तसंस्था
Tuesday, 17 September 2019

कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करीत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

भोपाल : कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करीत भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. भगवे वस्त्र घालून लोक दुष्कर्म करीत आहेत. मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे.

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, 'भगवे वस्त्र घालून लोक दुष्कर्म करत आहेत, मंदिराच्या आवारात महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडत आहेत. हाच आपला धर्म आहे का?अशाप्रकारचं काम करणाऱ्या लोकांना सनातन धर्म कधीच माफ करणार नाही. एखादी व्यक्ती आपल्या कुटंबाला सोडून साधू बनते. धर्माचं आचरण करुन ती अध्यात्माचा मार्ग अवलंबते. मात्र आज लोकं भगवे वस्त्र घालून चूर्ण विकत आहेत.' 

याशिवाय भाजपाचं नाव न घेता त्यांनी टीका केली. पार्टीचे लोक मंदिरांवर आणि मठांवर ताबा घेत आहेत. 'जय श्रीराम' च्या नाऱ्यावरही एका पार्टीने ताबा घेतलाय. त्यामुळे आपल्याला जय सीताराम म्हणणं भाग आहे, असं मत यावेळी दिग्विजय सिंह व्यक्त केलं.

'मंदिरामध्ये बलात्कार होत आहेत' हा टोला थेट स्वामी चिन्मयानंद यांच्यावर करण्यात आला होता. चिन्मयानंद यांच्यावर एका विद्यार्थीनीने विनयभंगाचे गंभीर आरोप लावले आहेत. त्यांच्यावर न्यालयीन खटला चालविण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय चिन्मयानंद यांना लवकरच अटक होण्याचीही शक्यता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People wearing saffron robes committing rapes inside temples Digvijaya Singh