पीपल्स आघाडीचे फारुख अब्दुल्ल्ला प्रमुख; उपाध्यक्षपदी मेहबूबा मुफ्ती यांची निवड

पीटीआय
Sunday, 25 October 2020

जम्मू- काश्‍मीरमध्ये ३७० व्या कलमासाठी आग्रही असलेल्या स्थानिक पक्षांनी हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. गुपकर ठराव प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीपल्स अलायन्सच्या अध्यक्षपदी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली असून पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या आघाडीच्या उपाध्यक्ष असतील अशी माहिती या आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये देण्यात आली आहे.

श्रीनगर - जम्मू- काश्‍मीरमध्ये ३७० व्या कलमासाठी आग्रही असलेल्या स्थानिक पक्षांनी हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. गुपकर ठराव प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीपल्स अलायन्सच्या अध्यक्षपदी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची निवड करण्यात आली असून पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती या आघाडीच्या उपाध्यक्ष असतील अशी माहिती या आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माकपचे ज्येष्ठ नेते मोहंमद युसूफ तारिगामी यांना या आघाडीचे समन्वयक करण्यात आले असून पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  दरम्यान पीपल्स आघाडीच्या स्थापनेनंतर आज पहिल्यांदाच या आघाडीच्या नेत्यांची मेहबूबा मुफ्ती यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या आघाडीने काश्‍मीरसाठी वेगळा ध्वज आणि चिन्ह देखील तयार केले आहे. केंद्र सरकारने जम्मू- काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतरच्या राज्यातील शासकीय व्यवस्थेबाबत महिनाभराच्या आत श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची घोषणा या आघाडीने केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी ध्वजाचा अपमान कसा केला, असा सवाल केला.  या वेळी धर्मनिरपेक्षवाद्यांनी मौन का पाळले, अशी विचारणा केली आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peoples aghadi chief farooq abdullah and deputy chief mehbooba mufti