पंतप्रधान मोदींना जनतेचा मोठा पाठिंबा : अमित शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पंतप्रधान मोदींना जनतेचा मोठा पाठिंबा आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पक्षाची स्थिती सुधारेल. तर उत्तर प्रदेशातील एकही जागा कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही.

- अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या पंतप्रधानपदाचा चेहरा असतील. मात्र, तुमच्या महागठबंधनच्या पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (मंगळवार) विरोधकांना केला. तसेच पंतप्रधान मोदींना जनतेचा मोठा पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. 

अहमदाबाद येथे 'मेरा परिवार, भाजप परिवार'च्या अभियानानंतर शहा बोलत होते. ते म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते मला फोन करतात आणि ते महागठबंधनबाबत आपले विचार व्यक्त करतात. ते मला विचारतात, की काय होईल? तेव्हा मी त्यांना म्हणतो महागंठबंधनबाबत असणारी तुमच्या मनातील भीती जावी, असे मी त्यांना सांगतो.  तसेच शहा पुढे म्हणाले, मी देशभर फिरलो. तेव्हा मला कळले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी जनता भक्कमपणे उभी आहे.

पंतप्रधान मोदींना जनतेचा मोठा पाठिंबा आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये पक्षाची स्थिती सुधारेल. तर उत्तर प्रदेशातील एकही जागा कोणत्याही परिस्थितीत कमी होणार नाही, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: peoples Big Support to PM Modi says Amit Shah