चिनी सैन्यात हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती, गुप्तचर अहवालातून धक्कादायक माहिती समोर I Chinese Army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

People's Liberation Army China

चीन आपल्या आर्मीत हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती करत आहे.

चिनी सैन्यात हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती, गुप्तचर अहवालातून माहिती समोर

नवी दिल्ली : चीन आपल्या पीपल्स लिबरेशन आर्मीमध्ये (People's Liberation Army, China) हिंदी जाणणाऱ्या (Hindi language) तरुणांची भरती करत आहे. एका गुप्तचर अहवालातून (Intelligence Report) ही माहिती समोर आलीय. तिबेट स्वायत्त प्रदेशातील नियंत्रण रेषेवर (LAC) गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आणि अडथळे निर्माण करण्यासाठी चीनचं सैन्य हे करत असल्याचं त्यात म्हटलंय. यासाठी चीनमधील विविध विद्यापीठांतील नवीन पदवीधरांना हिंदी दुभाषी म्हणून नेमण्याची तयारी सुरू केलीय.

गुप्तचर माहितीनुसार, तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्ट या वर्षी जूनपर्यंत भरती मोहीम आखत आहे. त्यासाठी वेस्टर्न थिएटर कमांड अंतर्गत भरती केली जाणार आहे. दरम्यान, हे सैन्य भारताच्या सीमांवर लक्ष ठेवून राहणार आहे. तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्ट (Tibet Military District) भारताच्या ईशान्येकडील राज्ये सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेल्या क्षेत्रासाठी काम करणार आहे. इथं शिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टला (Independent Division of Xinjiang Military District) लडाखच्या सीमेला लागून असलेल्या भागांसह LAC च्या इतर भागांची जबाबदारी देण्यात आलीय.

हेही वाचा: रशियाची जपानवर मोठी कारवाई, पंतप्रधानांसह 63 अधिकाऱ्यांच्या प्रवेशावर घातली बंदी

मिळालेल्या माहितीनुसार, तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत हिंदी दुभाष्यांसाठी अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठांना भेटी दिल्या आहेत. इथं जाऊन ते त्यांच्या लष्करी कार्यक्रमांची माहिती देतात आणि स्वत:साठी नवीन सैनिकांची भरती करतात. एका गुप्तचर अहवाल असं म्हटलंय की, PLA सक्रियपणे तिबेटी लोकांची भरती करत आहे. जे भारताच्या उत्तर सीमेवर असलेल्या त्यांच्या छावण्यांसाठी हिंदी बोलू (Hindi Youth Recruitment) शकतात. हिंदी जाणणाऱ्या तरुणांसाठी लष्करानं ही मोहीम चालवलीय. या तरुणांव्यतिरिक्त सैन्यानं आपल्या सैनिक आणि अधिकाऱ्यांना हिंदी शिकवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केलाय, असं नमूद केलंय.

Web Title: Peoples Liberation Chinese Army Is Recruiting Youth Who Know Hindi Revealed In Intelligence Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChinaTibet
go to top