Wed, November 29, 2023

युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियानं जपानवर मोठी कारवाई केलीय.
रशियाची जपानवर मोठी कारवाई, पंतप्रधानांसह 63 अधिकाऱ्यांच्या प्रवेशावर घातली बंदी
Published on : 4 May 2022, 11:49 am
Russia Ukraine War : युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान रशियानं जपानवर (Japan) मोठी कारवाई केलीय. रशियानं जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (PM Fumio Kishida) यांच्यासह देशातील 63 अधिकाऱ्यांवर बंदी घातलीय. यामध्ये परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी, संरक्षण मंत्री नोबुओ किशी आणि इतर अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं आज (बुधवार) ही घोषणा केलीय.
मंत्रालयाच्या या बंदीमागचं कारण 'बेताल वक्तृत्व' असल्याचं सांगण्यात आलंय. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की, या लोकांच्या प्रवेशावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आलीय. हे लोक मॉस्कोविरुद्ध खोटी विधानं करतात, त्यामुळेच जपानविरोधात अशी भूमिका घेण्यात आलीय, असं त्यांनी स्पष्ट केलंय.