देशात हिजाबवरुन तांडव; अमेरिकेत पायलटला मिळाली ऑन ड्युटी 'हिंदुत्व' जपण्याची मुभा

यासाठी शाह दोन वर्षांपासून यासाठी परवानगी देण्याची मागणी करत होते.
Darshan Shah
Darshan ShahSakal

वॉशिंग्टन : हिंदूंच्या श्रद्धेचा आदर करत अमेरिकन हवाई (American Air Force ) दलाने भारतीय वंशाच्या वायुसैनिकाला (Pilot) कपाळावर टिळा लावून कर्तव्य बजावण्याची परवानगी दिली आहे. अमेरिकेतील व्योमिंग येथील एअरबेसवर तैनात असलेले दर्शन शाह (Darshan Shah) दोन वर्षांपासून यासाठी परवानगी देण्याची मागणी करत होते. एवढेच नव्हे तर, त्यांच्या या मागणीला ऑनलाइन ग्रुप चॅटच्या माध्यमातूनही जगभरातून पाठिंबा दिला जात होता. अखेर शाह यांना धार्मिकतेच्या आधारावर ही सूट देण्यात आली आहे.

Darshan Shah
गडकरींच्या टोल घोषणांवर महामार्ग विकास मंत्रालयाचे स्पष्टीकरण

22 फेब्रुवारी 2022 रोजी शाह यांना त्यांच्या गणवेशासह टिळक लावण्याची परवानगी देण्यात आली असून, यानंतर "टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमधील माझे मित्र मला आणि माझ्या पालकांना संदेश पाठवत असल्याचे शाह यांनी सांगितले. या परवानगीनंतर मित्रांनी यूएस एअर फोर्समध्ये असे काहीतरी घडले आहे याचा खूप आनंद झाल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

जून 2020 मध्ये यूएस आर्मीमध्ये मूलभूत लष्करी प्रशिक्षण सुरू केल्यापासून दर्शन शाह यांनी गणवेशासह टिळक लावण्याची परवानगी देण्याची मागणी करत होते. एवढेच नव्हे तर, यासाठी ते दर महिन्याला अमेरिकन हवाई दलाच्या ग्लोबल स्ट्राइक कमांडशी संपर्क साधत होते, आणि अखेर त्यांच्या या मागणीला परवानगी देण्यात आली आहे.

Darshan Shah
पंढरपुरात तासाभरापूर्वी जन्मलेल्या बाळाला रस्त्यात सोडून पलायन

स्वामीनारायण पंथाशी संबंधित आहे शाहांचे कुटुंब

शाह यांचे पालनपोषण मिनेसोटा येथील एका गुजराती कुटुंबात झाले असून, हे कुटुंब बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तन स्वामीनारायण संस्थानशी जोडलेले आहे. या पंथाचे प्रतीक म्हणजे चंदनाचा टिळक असून ते U आकारातील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com