राज्य सरकारविरोधातील याचिका फेटाळली 

पीटीआय
Saturday, 17 October 2020

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. अशा प्रकारच्या मागण्यांकडे आम्ही लक्ष देऊ शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले. ‘याचिकाकर्ते म्हणून तुम्हाला राष्ट्रपतींकडे विनंती करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण इकडे येऊ नका’, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्राचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालत नसल्याने ते बरखास्त करावे, अशी मागणी विक्रम गेहलोत या व्यक्तीने केली होती. सुशांतसिंह प्रकरण आणि कंगना राणावत हिच्या कार्यालयाची तोडफोड अशी उदाहरणे देत याचिकाकर्त्यांनी हा दावा केला. मात्र, अशा काही घटनांमुळे राज्यघटनेचे पालन होत नाही, असे कसे म्हणता येईल? महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे, असे न्यायालयाने सुनावले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petition against the state government was rejected