पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरच्या खाली

petrol diesel Crude oil prices below
petrol diesel Crude oil prices belowpetrol diesel Crude oil prices below
Updated on

नवी दिल्ली : जागतिक मंदीच्या काळात भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीतील घसरण सुरूच आहे. आता ही घसरण प्रति बॅरल १०० डॉलरपर्यंत खाली आली आहे. गेल्या व्यापार दिवसांत तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुरुवारी (ता. ७) किंमत खाली आली आहे. क्रूडच्या किमती कमी झाल्यामुळे देशात पेट्रोल (petrol) आणि डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे.

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे ते जवळपास तीन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आले आहे. गुरुवारीही सुरुवातीच्या व्यापारात तेलाच्या किमती घसरल्या. याचे कारण असे की, संभाव्य जागतिक मंदीच्या भीतीमुळे तेलाच्या मागणीबाबत चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूड LCOc१ फ्युचर्स ७१ सेंटने घसरून ९९.९८ प्रति बॅरल डॉलर झाला. WTI क्रूड CLc१ फ्युचर्स ६२ सेंटने घसरून ९७.९१ प्रति बॅरल डॉलर झाला आहे.

petrol diesel Crude oil prices below
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव यूकेच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत

मंगळवारी WTI क्रूड ८ टक्क्यांनी आणि ब्रेंट क्रूड ९ टक्क्यांनी घसरले. नवीन माहिती, उत्पादन आणि वापराविषयीच्या चिंता तेलाच्या किमती खाली आणत आहेत, असे एसपीआय ॲसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय भागीदार स्टीफन इन्स यांनी म्हटले. बाजारातील स्रोतांवर विश्वास ठेवला तर बुधवारच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गेल्या आठवड्यात यूएस क्रूडचा साठा सुमारे ३.८ दशलक्ष बॅरलने वाढला आहे. तर गॅसोलीनचा साठा १.८ दशलक्ष बॅरलने कमी झाला आहे.

रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या काळात क्रूडची (Crude oil) किंमत २००८ च्या उच्च पातळीवर पोहोचली आणि प्रति बॅरल १३९ डॉलरवर पोहोचली. त्यानंतर किंमत कमी झाली आणि आता पुन्हा क्रूड १०० डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.

petrol diesel Crude oil prices below
भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचे नाव यूकेच्या पंतप्रधानपदासाठी चर्चेत

काय म्हणतात तज्ज्ञ

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती एक डॉलरने वाढल्या तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५० ते ६० पैशांनी वाढतात. त्याचप्रमाणे क्रुडच्या किमतीत (Crude oil) घट झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कपात होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांच्या मत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचा दर महत्त्वाचा

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या (diesel) किमती ठरवण्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील (International market) क्रूडचा दर महत्त्वाची भूमिका बजावतो. भारत कच्च्या तेलाचा मोठा आयातदार आहे. ८५ टक्क्यांहून अधिक कच्चे तेल बाहेरून खरेदी करतो. कच्च्या तेलाची किंमत अमेरिकन डॉलरमध्ये भारताला मोजावी लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या मजबुतीमुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम होतो. म्हणजेच इंधन महाग होऊ लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर भारताचे आयात बिलही वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com