esakal | Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल शंभरीला पाच कमी, डिझेलसोबत शतकी भागीदारी
sakal

बोलून बातमी शोधा

Petrol

नवे वर्ष पेट्रोलियम इंधनांबाबत सर्वसामान्यांसाठी वाईट ठरलं आहे.

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल शंभरीला पाच कमी, डिझेलसोबत शतकी भागीदारी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. सलग चौथ्या दिवशी दर वाढल्यानंतर डिझेलच्या किंमतींमध्ये 35 ते 38 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमती देखील 28 ते 29 पैशांनी वाढल्या आहेत. दिल्ली आणि मुंबईमधील पेट्रोलचे भाव आतापर्यंतच्या सर्वांत जास्त दरांवर आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव आज शुक्रवारी एका नव्या उंचीवर पोहोचले आहेत. पेट्रोलच्या भावात आज 29 पैशांनी वाढ झालीय तर डिझेलच्या भावात 35 पैशांची वाढ झाली आहे.  दिल्लीमध्ये पेट्रोलने 88.14 रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च दर गाठला आहे. तर मुंबईमध्येही याचप्रमाणे 94.64 रुपयांवर पेट्रोलचे भाव पोहोचले आहेत तर दिल्लीमध्ये डिझेलचे भाव 78.38 रुपयांवर तर मुंबईमध्ये 85.32 रुपयांवर पोहोचले आहे. 

 • शहर                 पेट्रोल(रु/लि.)    डिझेल (रु/लि.)
 • दिल्ली                    88.14    78.38
 • मुंबई                     94.64    85.32
 • चेन्नई                     90.44    83.52
 • कोलकाता              89.44    81.96
 • नोएडा                   87.05    78.80
 • रांची                      86.21    82.90
 • बेंगलुरु                  91.09    83.09
 • पटना                    90.55    83.58
 • चंडीगढ                 84.83    78.09
 • लखनऊ                86.99    78.75
   

नव्या वर्षी 4.33 रुपयांनी महाग झालंय पेट्रोल
नवे वर्ष पेट्रोलियम इंधनांबाबत सर्वसामान्यांसाठी वाईट ठरलं आहे. निव्वळ जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनच महिन्यांत पेट्रोलच्या भावात तब्बल 4.33 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये तर  पेट्रोल 94 रुपयांच्या पार पोहोचले आहे. याचपद्धतीने जवळपास सर्वच प्रमुख शहरांमध्ये  पेट्रोल आतापर्यंतच्या सर्वोच्च दरामध्ये विकलं जात आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात जवळपास 18 रुपयांनी वाढ झाली आहे. 

हेही वाचा - अर्थंसंकल्प हा श्रीमंतासाठी; चिदंबरम यांची टीका

 डिझेलदेखील 04.51 रुपयांनी महाग
पेट्रोलसोबतच डिझेलच्या किंमती देखील रेकॉर्डतोड सर्वोच्च स्तरावर आहेत. काल डिझेलच्या किंमतीत 30 पैशांनी वाढ झाली होती. आज परत 35 पैशांनी डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. नव्या वर्षात 16 दिवसांमध्ये डिझेल 04.51 रुपयांनी महाग झाले आहे. डिझेल देखील आतापर्यंतच्या सर्वोच्च दरामध्ये विकलं जात आहे. गेल्या 10 महिन्यांमध्ये डिझेलच्या भावात आतापर्यंत 16 रुपयांची वाढ झाली आहे. 

loading image
go to top