पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या किमतींत घट सुरुच

petrol rates
petrol ratesesakal

नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल- डिझेल (Petrol-Diesel) चे नवे दर जारी केले आहेत. केंद्र सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधी पेट्रोलवर 5 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींपासून दिलासा दिला होता. जर आज तुम्हीही तुमच्या गाडीत पेट्रोल किंवा डिझेल भरण्याचा विचार करत असाल, तर आजचे दर जाणून घ्या.

जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

अनेक राज्य अशी होती की, ज्यांनी व्हॅटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशातच काही दिवसांपूर्वी राजस्थान सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. राजस्थानमध्ये पेट्रोल 4 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 5 रुपये प्रति लिटरनं स्वस्त करण्यात आलं आहे. आज सलग एकोणवीसाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil One Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

petrol rates
रेल्वेने बदलला रामायण एक्सप्रेसच्या वेटर, कर्मचाऱ्यांचा ड्रेसकोड

देशातील महत्त्वाची शहरंपेट्रोल रुपये/लिटरडिझेल रुपये/लिटर

मुंबई 109.9894.14

दिल्ली109.69 98.24

कोलकाता 104.67 89.79

चेन्नई 101.4091.43

petrol rates
पाकिस्तानमधूनच हनी ट्रॅपचे कारस्थान; लष्करालाही ‘हनी ट्रॅप’चा धोका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com