पाकिस्तानमधूनच हनी ट्रॅपचे कारस्थान; लष्करालाही ‘हनी ट्रॅप’चा धोका | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

honey trap

पाकिस्तानमधूनच हनी ट्रॅपचे कारस्थान; लष्करालाही ‘हनी ट्रॅप’चा धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कधी घुसखोरी करून हल्ला करणे, ड्रोनने (Drone spying) नजर ठेवणे किंवा मित्र देशांशी संगनमत करून भारतात कुरापती करण्याची पाकिस्तानची (pakistan) सवय अद्याप मोडलेली नाही. त्यात आता हनी ट्रॅपचे कारस्थान (honeytrap) देखील पाकिस्तानमधून रचले जात असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

बेकायदेशीरपणे आयएसआयच्या महिला एजंटला हनी ट्रॅपच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात २०० नागरिक व जवानांना अटक केली आहे. पुण्यातील दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाने (एमआय) अशा प्रकरणांचा छडा लावून सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अशा १० प्रकरणांची उकल केली आहे.

हनी ट्रॅपसाठी आयएसआय दरवर्षी एक कोटी रुपये खर्च

करीत असल्याचा लष्करी गुप्‍तचर विभागाचा अंदाज आहे. पाकिस्तानमधील विविध ठिकाणांवरून बनावट फेसबुक खाते तयार करून त्याद्वारे जवानांना रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यानंतर चॅट सुरू झाल्यानंतर मैत्री वाढवून विश्‍वास निर्माण करण्यासाठी विविध बाबी हनी ट्रॅपदरम्यान सांगितल्या जातात.

हेही वाचा: शेअर बाजारात ब्लॅक मंडे; सेन्सेक्स 1170 अंश कोलमडला

महत्त्वाच्या घडामोडी

गेल्या वर्षभरात २०० नागरिक आणि जवानांना अटक

दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाच्या (एमआय)

पुणे पथकाने अशा प्रकरणांचा लावला छडा

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अशा १० प्रकरणांची उकल

हनी ट्रॅपसाठी आयएसआय दरवर्षी एक कोटी रुपये खर्च करते

पाकिस्तानमधील विविध ठिकाणांवरून बनावट फेसबुक खाते तयार करण्यात येतात

विश्‍वास निर्माण करण्यासाठी सांगतात या बाबी

फोटोच्या मागे भारतीय ध्वज असलेला फोटो पोस्ट करणे

देशातील कलाकारांबरोबरचा फोटो समाज माध्यमावर टाकणे

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नात्यातील असल्याचे सांगणे

माहिती देण्याच्या बदल्यात लॅपटॉप किंवा आयफोनचे आमिष दाखवणे

माहितीच्या बदल्यात पैसे देणे

मैत्री वाढल्यानंतर संबंधित मुली जवानाच्या नावाचे सिम त्यांच्याकडून घेतात

लष्करात नर्स किंवा लष्करी अधिकाऱ्याची मुलगी असल्याचे जवानांना भासवले जाते

लष्करी अधिकारी व जवानांकडे असलेली जबाबदारी आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची माहिती मिळवता येते याचा अभ्यास समाज माध्यमातून केला जातो. त्यानुसार त्यांना जाळ्यात अडकवले जाते. मात्र, यासाठी लष्कर उपाययोजना करत आहे. सर्व अधिकाऱ्यांच्या समाज माध्यमांच्या वापरावर मर्यादा लावल्या आहेत. अधिकाऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये देखील सहभाग होता येत नाही.

- मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त)

loading image
go to top