esakal | Petrol-Diesel Price Today: काय आहे आजचा भाव; जाणून घ्या
sakal

बोलून बातमी शोधा

petrol

Petrol-Diesel Price Today: काय आहे आजचा भाव; जाणून घ्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Petrol-Diesel Price in India: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत. आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करण्यात आला नाहीये. इंडियर ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) च्या सांगण्यानुसार, 13 ऑक्टोबरला सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 104.44 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेलचा भाव 93.17 रुपये प्रति लीटर आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत फक्त तीनवेळाच पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये स्थिरता जाणवली आहे. मात्र, देशभरात इंधनाचे दर सध्या गगनाला भिडले असून आतापर्यंतचे सर्वांत जास्त दर आहेत.

हेही वाचा: PM मोदी आज करणार 100 लाख कोटींच्या 'गतीशक्ती' योजनेचा शुभारंभ

ऑक्टोबर महिन्यात इंधन दरवाढीचा कळस

या महिन्यात 4, 12 आणि 13 ऑक्टोबर सोडता इतर सगळ्या दिवशी तेलांच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोलचा भाव 30 पैसे प्रति लीटरनी वाढला आहेत तर डिझेलच्या किंमती 35 पैशांनी वाढल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये डिझेलच्या किंमतींनी शंभरी पार केली आहे. केरळ, कर्नाटक, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगना, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि लेहमध्ये सध्या डिझेल 100 रुपये प्रति लीटरप्रमाणे विकलं जात आहे.

हेही वाचा: VIDEO: 5.16 कोटी रुपयांची सजावट; नोटांनी सजवलं देवीचं मंदिर

महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

शहर पेट्रोल डीजल

दिल्ली 104.44 93.17

मुंबई 110.41 101.03

कोलकाता 105.05 96.24

चेन्नई 101.76 97.56

loading image
go to top