esakal | VIDEO: 5.16 कोटी रुपयांची सजावट; नोटांनी सजवलं देवीचं मंदिर
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO: 5.16 कोटी रुपयांची सजावट; नोटांनी सजवलं देवीचं मंदिर

VIDEO: 5.16 कोटी रुपयांची सजावट; नोटांनी सजवलं देवीचं मंदिर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देवाची भक्ती ही अशी बाब आहे, जिथे ऐकावं ते नवलच, अशी परिस्थिती असते. देवाच्या भक्तीसाठी लोक काय करतील, याचा काही नेम नाही. देवाला अमुक किलो सोन्याचा हार, तमुक किलो चांदीचा मुकूट अशा बातम्या तुम्ही याआधी खूपदा ऐकल्या असतील. मात्र, आता देवाच्या भक्तीबाबत अशी एक कृती समोर आलीय, जी पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आंध्र प्रदेशमधील नेल्लोरमध्ये कन्याका परमेश्वरी मंदिरामध्ये दसऱ्याच्या निमित्ताने पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक नोटांची सजावट केली गेली आहे.

हेही वाचा: "हाथरस घटनेवर अश्रू ढाळणाऱ्या प्रियांका पुण्यातील प्रकरणावर चुप?"

या मंदिरामध्ये वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी देवीच्या विविध अवतारांची पूजा केली जाते. नऊ दिवसीय नवरात्री-दसरा समारंभाच्या वेळी देवीला धनलक्ष्मीच्या रुपात सजवून तिची पूजा केली जाते. 100 हून अधिक स्वयंसेवकांनी पाच कोटी 16 लाख रुपयांच्या नोटांनी मंदिराला सजवण्याचं काम केलं. या सजावटीसाठी दोन हजार रुपये, पाचशे रुपये, दोनशे रुपये, शंभर रुपये, पन्नास रुपये, दहा रुपयांच्या नोटांचा वापर केला गेला आहे.

हेही वाचा: ठसका लागला तरी सर्दी-खोकला झाल्याचा खुलासा करण्याची वेळ आली : व्लादिमीर पुतीन

चार वर्षांपूर्वी 11 कोटी रुपये खर्चून जुन्या कन्याका परमेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. तेंव्हापासून नवरात्री-दसरा समारंभ दरवर्षी मोठ्या भव्य पद्धतीने साजरा केला जातो. या वर्षी देखील मोठ्या उत्साहात आणि धामधुमीत हा उत्सव साजरा केला जातो आहे.

याबाबत एका प्रमुख व्यक्तीने माहिती देताना सांगितलं की, सात किलो सोने आणि साठ किलो चांदीचा वापर देवीच्या सुशोभिकरणासाठी केला जातो. अनेक ठिकाणी नोटांनी देवांची पूजा केली जाते. मात्र, नेल्लोरमधील लोकांचं म्हणणं आहे की, एवढ्या रुपयांच्या नोटांनी मंदिराची सजावट करणे, ही असामान्य गोष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2020 साली तेलंगानामध्ये कन्याका परमेश्वरी मंदिराला दसऱ्याच्या उत्सवावेळी एक कोटी रुपयांहून अधिक नोटांची सजावट करण्यात आली होती. गेल्या वर्षी माळा बनवून सजावट करण्यासाठी, 1,11,111 रुपयांच्या वेगवेगळ्या रंगांच्या नोटांचा वापर करण्यात आला होता.

loading image
go to top