1947मध्ये भारतात पेट्रोल किती रुपयांना मिळत होतं? वाचा 74 वर्षांत बदललेला भारत

jawaharlal nehru.jpg
jawaharlal nehru.jpg

नवी दिल्ली- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. 2020 मध्ये भारत 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या सात दशकांमध्ये खूप काही बदललं आहे. भारतात सुशिक्षित लोकांची संख्या चार पटीने वाढली आहे. तसेच भारतीयांच्या दरडोई उत्पन्नातही वाढ झाली आहे. वेळेनुसार देशामध्ये अनेक बदल घडून आले आहेत. यातील काही बदल आपण पाहूया-

- 1947 मध्ये प्रति व्यक्ती लोकांचे वार्षिक उत्पन्न 274 रुपये होते, तेच 2020 मध्ये 1.35 लाख रुपये झाले आहे. 

-1947 मध्ये लोकसंख्येची घनता 117 होती (चौरस वर्ग किलोमीटरमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या), 2020 मध्ये लोकसंख्येची घनता 410 झाली आहे.   

- भारताला 'सोने कि चिडिया' म्हटलं जायचं. भारतीयांचे सोन्यावर विशेष प्रेम आहे. 1947 मध्ये सोन्याची किंमत 10 ग्रॅमसाठी 88.62 रुपये होती. सध्या सोन्याचा दर 53 हजारांच्या जवळपास आहे.

- 1947 ंमध्ये देशात पेट्रोलचा दर 0.27 पैसे होता, 2020 मध्ये तो वाढून 90 रुपयांच्या जवळपास गेला आहे. 

- प्रजनन दराबाबत सांगायचं झालं, तर स्वातंत्र्यापूर्वी महिलांची सरासरी 5.9 मुलं असायची, 2020 मध्ये हा आकडा कमी होऊन 2.2 झाला आहे. म्हणजे आता भारतीय महिलांना सरासरी दोन मुलं असतात. 

- 1947 मध्ये भारतीयांचे सरासरी आयुष्य 37 वर्षे होते, 74 वर्षांनतर यामध्ये चांगली सुधारणा झाली आहे. 2020 मध्ये लोकांचे सरासरी आयुष्य 69 वर्षे आहे.  

- शहरी लोकसंख्येबाबत बोलायचं झालं तरं, स्वातंत्र्यावेळी एकूण लोकसंख्येच्या 17 टक्के लोक शहरात राहायचे, आता ती वाढून 35 टक्के झाली आहे. ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. 

- भारतीयांमध्ये गाड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1947 मध्ये 1 लाख लोकांमागे 41 जणांच्या नावे कार रजिस्टर्ड होती. 2020 मध्ये 1 लाख लोकांमागे 2,275 भारतीयांच्या नावावर कार किंवा जीप रजिस्टर्ड आहे. 

- 74 वर्षांमध्ये भारतीयांच्या वीज वापरातही वाढ झाली आहे. स्वातंत्र्यावेळी प्रति व्यक्ती 16 kwh वीज वापरली जायची, ती वाढून आता 1,181 झाली आहे. 

- देशात साक्षरता वाढली आहे. भारतीयांना शिक्षणाचं महत्व कळू लागलं आहे. स्वातंत्र्यावेळी देशाचा साक्षरता दर 18 टक्के होता, तो वाढून आता 78 टक्के झाला आहे.

- स्वातंत्र्यानंतर प्रत्येक गावात वीज पोहचावी यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. स्वातंत्र्यावेळी केवळ 3,061 गावांमध्ये वीज होती. सध्या भारतातील 5,94,464 गावांमध्ये वीज पोहोचली आहे. 

- अगोदर प्रति लाख व्यक्तींमागे 152 लोकांवर आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल असायचा, आता तो वाढून 232 झाला आहे. 

-देशात बॉलिवुड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 1947 मध्ये दिलीप कुमार यांचा चित्रपट जुगनू सर्वाधिक हिट होता. यावर्षी तानाची-द अनसंग वॉरियर चित्रपट हिट ठरला. 

- गेल्या सात दशकात भारताच्या नकाशामध्येही बदल झाला आहे. सिक्किम सारखे राज्य भारतात नव्याने सामील झाले. शिवाय अनेक राज्यांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आला आहे. अनेक नव्या राज्यांची स्थापना करण्यात आली. सध्या भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. 

- भारत 1950 मध्ये प्रजासत्ताक राष्ट्र झाले. देशात संविधान 1952 सालापासून लागू झाले. त्यावेळी 1 डॉलरची किंमत 4.16 रुपये होती. त्यानंतर रुपयांचे अवमुल्यन करण्यात आले.

- 1951 च्या जनजनणेवेळी भारताची लोकसंख्या 36 कोटींच्या पुढे होती. सध्या भारताची लोकसंख्या 130 कोंटीच्या जवळपास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com