मुंबईत पेट्रोल ८० रुपयांवर पोचले

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल १६ ते १७ पैसे तर डिझेल प्रति लिटर १८ ते १९ पैशांनी महागले आहे.

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी वाढ झाली आहे. यामुळे देशांतर्गत इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल १६ ते १७ पैसे तर डिझेल प्रति लिटर १८ ते १९ पैशांनी महागले आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमधील पेट्रोलच्या किंमती अनुक्रमे ७५.०४ रुपये, ७७.७० रुपये, ८०.६९ रुपये आणि ७८.०२ रुपये प्रतिलिटरवर पोचल्या आहेत. आता ग्राहकांना पुन्हा एकदा इंधन वाढीचे चटके बसणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक पातळीवर खनिज तेलाची किंमत प्रतिबॅरल ६५ डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. परिणामी तेल आयातीच्या खर्चात वाढ झाल्याने देशांतर्गत इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलची भाववाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली, तर डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशीही वाढ कायम आहे.

इंटरकॉन्टिनेंटल एक्‍सचेंजमध्ये (आयसीई) आंतरराष्ट्रीय फ्युचर्स मार्केटमध्ये सोमवारी बेंचमार्क ‘ब्रेंट क्रूड’ची किंमत गेल्या सत्राच्या तुलनेत ०.२२ टक्‍क्‍यांनी वाढून ६७.०२ डॉलर प्रति बॅरलवर पोचली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol rate 80 rupees in mumbai