सीता, रावणाच्या देशातील पेट्रोल-डिझेलचे दर रामाच्या भारतापेक्षा कमी कसे?, मोदी सरकारनं दिलं हे उत्तर..

सकाळ ऑनलाइन टीम
Wednesday, 10 February 2021

सीता मातेच्या नेपाळमध्ये पेट्रोल, डिझेल भारतापेक्षा स्वस्त आहे. रावणाचा देश श्रीलंकेतही भारतापेक्षा कमी दर आहेत. मग रामाच्या देशातील सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करतील का ?, असा सवाल त्यांनी केला. 

नवी दिल्ली- देशात मागील दोन महिन्यांपासून सातत्त्याने इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात इतकी वाढ झाली आहे की, आज 10 फेब्रुवारी 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलची आतापर्यंतच्या उच्च स्तरावर विक्री होत आहे. दरम्यान, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी इंधनाच्या दराबाबत सुरु चर्चांना उत्तर देताना इंधन आपल्या ऑल टाइम उच्च स्तरावर आहे, असे म्हणणे योग्य नसल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी शेजारील देशांशी होत असलेल्या तुलनेवरही भाष्य केले. 

दरम्यान, समाजवादी पक्षाचे खासदार विशंभर प्रसाद निषद यांनी धर्मेंद प्रधान यांना राज्यसभेत प्रश्न विचारला. सीता मातेच्या नेपाळमध्ये पेट्रोल, डिझेल भारतापेक्षा स्वस्त आहे. रावणाचा देश श्रीलंकेतही भारतापेक्षा कमी दर आहेत. मग रामाच्या देशातील सरकार पेट्रोल-डिझेलचे दर कमी करतील का ?, असा सवाल त्यांनी केला. 

हेही वाचा- सोनं 16 वर्षांत 7000 वरुन पोहोचले तब्बल 56000 हजारांवर

यावर धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, या देशांशी भारताची तुलना करणे चुकीचे आहे. कारण तिथे समाजातील काही लोकच याचा उपयोग करतात. केरोसिनच्या किमतीत भारत आणि या देशांमध्ये मोठे अंतर आहे. बांगलादेश, नेपाळमध्ये केरोसिन सुमारे 57 ते 59 रुपयांमध्ये मिळते. तर भारतात केरोसिनची किंमत 32 रुपये प्रति लिटर आहे. 

इंधनाचे दर ऑलटाइम उच्च स्तरावर नाहीत
धर्मेंद प्रधान यांनी इंधनाचे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर असल्याची चर्चा खोडली. काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल यांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. देशात पेट्रोल-डिझेलचे दर ऑल टाइम हाय आहे. परंतु, कच्च्या तेलाचे दर ऑल टाइम हाय नाही. माझ्या देशात पेट्रोल 100 रुपयांच्या जवळ पोहोचले आहे. उत्पादन शूल्क कितीवेळा वाढवले आहे ?, असे सवाल त्यांनी केला. त्यावर प्रधान म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर 61 डॉलर सुरु आहे. आज आम्हाला टॅक्सशी निगडीत प्रकरणे खूप काळजीपूर्वक हाताळावे लागतात. 

हेही वाचा- Breaking : व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर EDचा छापा

त्यांनी सांगितले की, मागील 300 दिवसांमध्ये 60 दिवस असे आहेत की, त्यावेळी किमत वाढवण्यात आली होती. पेट्रोलची किंमत 7 दिवस कमी केली. तर डिझेलचे दर 21 वेळा कमी केले. सुमारे 250 दिवस असे आहेत. ज्यात कधीच किंमतीत बदल केला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर ऑल टाइम उच्च दरावर आहेत, असे म्हणणे अतार्किक आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petroleum Minister dharmendra pradhan speaks on petrol diesel prices hikes in parliament