

LPG Gas Shortage
ESakal
देशातील गॅस संकटाबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितले की, देशात पुरेसे जेपीजी गॅस सिलिंडर आहेत. कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. सरकारने काळाबाजार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम मंत्र्यांच्या मते, ग्रामीण भागात ४५ दिवसांनी आणि शहरी भागात २५ दिवसांनी दुसऱ्या एलपीजी सिलिंडरसाठी बुकिंग करण्याची परवानगी असेल.