Muslim Population: 2035 पर्यंत ख्रिश्चन धर्माला मागे टाकून इस्लाम सर्वात मोठा धर्म बनणार? प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल; भारतात काय परिस्थिती असेल?

Pew Research Report Projects India's Hindu and Muslim Population: प्यू रिसर्चच्या अहवालानुसार, २०२० मध्ये जगात सर्वात जास्त ख्रिश्चन- सुमारे २.२७ अब्ज होते. तर मुस्लिमांची लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर, म्हणजे सुमारे २.०२ अब्ज होती.
Pew Research report India population

Pew Research report India population

esakal

Updated on: 

Pew Research Report India Hindu Muslim Population Growth

अमेरिकन थिंक टँक 'प्यू रिसर्च सेंटर'च्या अहवालाने संपूर्ण जगाच्या धार्मिक लोकसंख्याशास्त्राबाबत मोठा खुलासा केला आहे. जर सध्याचा कल कायम राहिला, तर २०३५ पर्यंत इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्माला मागे टाकून जगातील सर्वात मोठा धर्म बनेल. हा अंदाज २०२० ते २०७० दरम्यानच्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर आधारित आहे, ज्यामध्ये जगातील ९९.९८ टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या २०१ देश आणि प्रदेशांचे विश्लेषण केले गेले आहे. या अहवालातील भारताची आकडेवारी देशातील सामाजिक आणि राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...