PFI च्या ट्विटर अकाउंटवरही बंदी; सरकारच्या तक्रारीनंतर 'ट्विटर इंडिया'ची मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PFI Twitter Account Banned

केंद्रीय गृह मंत्रालयानं पीएफआयवर 5 वर्षांच्या बंदीनंतर ही कारवाई केलीय.

PFI च्या ट्विटर अकाउंटवरही बंदी; सरकारच्या तक्रारीनंतर 'ट्विटर इंडिया'ची मोठी कारवाई

PFI Twitter Account Banned : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India PFI) ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्यात आलीय. केंद्रीय गृह मंत्रालयानं पीएफआयवर 5 वर्षांच्या बंदीनंतर ही कारवाई केलीय. भारत सरकारच्या (India Government) तक्रारीनंतर ट्विटर इंडियानं (Twitter India) पीएफआयच्या खात्यावर बंदी घातली आहे.

केंद्र सरकारनं 28 सप्टेंबर रोजी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) बंदी घातली. अनेक राज्यांनी पीएफआयवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर एनआयए, सर्व राज्यांचे पोलीस आणि एजन्सींनी पीएफआयच्या कार्यालयावर छापे टाकले आणि शेकडो लोकांना अटक केली. केंद्रीय गृह मंत्रालयानं पीएफआयला 5 वर्षांसाठी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केलं. पीएफआय व्यतिरिक्त 8 संलग्न संस्थांवरही कारवाई करण्यात आलीय.

हेही वाचा: RSS ला शिव्या देऊन काँग्रेस आपली पापं धुवू शकत नाही; PFI बंदीवरुन संघाचं प्रत्युत्तर

'या' 8 संस्थांवरही कारवाई

पीएफआय व्यतिरिक्त रिहॅब इंडिया फाउंडेशन (RIF), कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (CFI), ऑल इंडिया इमाम कौन्सिल (AIIC), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन (NCHRO), नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशनसारख्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आलीय.

हेही वाचा: PFI बंदीनंतर 'या' राजकीय पक्षावर कारवाई होणार? SDPI निवडणूक आयोगाच्या रडारवर