RSS ला शिव्या देऊन काँग्रेस आपली पापं धुवू शकत नाही; PFI बंदीवरुन संघाचं प्रत्युत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RSS vs Congress

'आरएसएस हा लोकशाहीचा रक्षक म्हणून उदयास आला आहे.'

RSS ला शिव्या देऊन काँग्रेस आपली पापं धुवू शकत नाही; PFI बंदीवरुन संघाचं प्रत्युत्तर

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) नेते इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेत्यानं RSS ची तुलना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front of India PFI) सोबत केल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिलीय. इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर टीका करत संघावर बंदी घालण्याची मागणी केल्यामुळं त्यांचं पाप कमी होणार नसल्याचं म्हटलंय.

केंद्रानं पीएफआयवर (PFI) बंदी घातल्यानंतर केरळ काँग्रेसचे खासदार कोडीकुन्नील सुरेश (Congress MP Kodikunnil Suresh) यांनी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली. खासदार सुरेश म्हणाले, आम्ही आरएसएसवरही बंदीची मागणी करत आहोत. पीएफआयवर बंदी घालणं हा उपाय नाही. कारण, आरएसएस देशभरात हिंदू जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केलाय.

हेही वाचा: Asaduddin Owaisi : PFI वर पाच वर्षांची बंदी; ओवैसी संतापून म्हणाले, एखाद्या व्यक्तीनं गुन्हा केला तर..

'देशाच्या फाळणीला डावे आणि काँग्रेस कारणीभूत'

काँग्रेस नेत्याच्या मागणीला प्रत्युत्तर देताना आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार म्हणाले, "आरएसएसवर बंदी घालण्याची आणि त्याचा पीएफआयशी संबंध जोडण्याची मागणी पूर्णपणे असंवैधानिक आणि देशाच्या सन्मानाच्या विरोधात आहे. देशाच्या फाळणीला डावे आणि काँग्रेस कारणीभूत आहे. त्यामुळं आरएसएसला शिव्या देऊन काँग्रेस हे पाप कधीच धुवू शकत नाही. त्यांचं पाप सदैव त्यांच्यासोबत राहील."

हेही वाचा: Drone Strike : इराकच्या कुर्दिस्तान भागात इराणनं डागलं क्षेपणास्त्र; हल्ल्यात 13 ठार, 58 जण जखमी

'आरएसएस हा लोकशाहीचा रक्षक आहे'

याआधी जेव्हा काँग्रेस सरकारानं आरएसएसवर बंदी घातली होती, तेव्हा पक्षाला प्रत्येक वेळी पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसनं 1948 मध्ये आरएसएसवर बंदी घातली होती. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये ते सहभागी असल्याचा आरोप करत होते. परंतु, ते काहीही सिद्ध करू शकले नाहीत. अखेर त्यांना बंदी उठवावी लागली. इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. पण, त्यांनाही बंदी उठवावी लागली, त्यामुळं त्यांची हुकूमशाहीही संपुष्टात आली. आरएसएस हा लोकशाहीचा रक्षक म्हणून उदयास आला आहे, असंही इंद्रेश कुमार यांनी स्पष्ट केलं.