Pfizer | फायझरने भारतात आशियातील सर्वात मोठे 'औषध विकास केंद्र' केले सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pfizer-Company

Pfizer | फायझरने भारतात आशियातील सर्वात मोठे 'औषध विकास केंद्र' केले सुरु

चेन्नई : औषधनिर्माण कंपनी फायझरने जागतिक औषध विकास केंद्राची स्थापना चेन्नईतील आयआयटी मद्रासच्या रिसर्च पार्कमध्ये केली आहे. यातून गुंतागुंतीचे संशोधन आणि विकास क्षमता एकाच छताखाली आणले जाणार आहे. या केंद्रात दोन प्रकारचे विकासात्मक कामे केले जाईल, एक अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडिएन्ट्स (API) आणि फिनिश्ड डोसेज फाॅर्मस (FDFs) वेगवेगळे उत्पादने जसे की काॅम्प्लेक्स/ व्ह्यु अॅडेड फाॅर्म्युलेशन आदी. फायझरचे औषध विकास केंद्र हे आयआयटी मद्रास संशोधन पार्कमध्ये असणे ही चांगली संधी आहे. यातून अत्याधुनिक प्रयोगशाळा जे फायझर संशोधन आणि विकासासाठी स्थापन करित आहे, त्यास मदत होईल, असे फायझर (Pfizer) इंडिया व्यवस्थापक एस श्रीधर यांनी सांगितले. (Pfizer Sets Up Asia's First Global Drug Development Centre In India)

आम्हाला विश्वास आहे, की यातून एपीआय आणि एफडीएफ प्रक्रिया एकाच छताखाली केले जाणार आहे. आमच्या कार्यासाठी जागतिक दर्जाचे वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि संशोधन केंद्र हे संशोधन पार्क कॅम्पससाठी आदर्शवत आहे. आम्हाला आशा आहे, की आयआयटी मद्रास (IIT Madras) आणि इतर तंत्रज्ञान संशोधन पार्क स्टार्ट-अप्स अकादमिक आणि उद्योगांची भागीदारी सुधारेल आणि यातून सहकार्य आणखीन वाढेल, असे श्रीधर म्हणाले.

फायझरने आयआयटी मद्रास संशोधन पार्कमध्ये १५० कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक ६१ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्रात केली आहे. हे केंद्र १२ जागतिक केंद्रांचा भाग असेल. हे पहिले आणि एकमेव केंद्र आहे जे सध्या आशियात स्थापन केले जात आहे.