
जगात वाढतेय उपासमारी, २०२१ मध्ये ४ कोटी लोकांना अन्नच मिळाले नाही
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) बुधवारी सांगितले, की युद्ध, हवामान बदल आणि आर्थिक संकटामुळे लोकांची उपजीविका नष्ट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी भूकेशी सामना करणाऱ्या लोकांची संख्या वाढून 193 मिलियन झाली. तज्ज्ञांनी इशारा दिला, की युक्रेनमध्ये रशियाच्या (Russia) युद्धामुळे दुष्काळ पडू शकतो. एफएओने एका वार्षिक अहवालात म्हटले, की २०२१ मध्ये जवळपास ४० मिलियन आणखीन लोकांना तीव्र अन्नअसुरक्षेत ढकलण्यात आले. उपासमारीची समस्येला सामोरे जाणाऱ्या ५३ देशांमध्ये, सर्वाधिक प्रभावित काँगो, इथिओपिया, येमेन आणि अफगाणिस्तान आदींचा समावेश होतो. अफगाणिस्तानमध्ये २०२१ साली तालिबानने देशावर नियंत्रण मिळविल्यानंतर देश आर्थिक संकटात अडकल्याने लाखो लोक उपासमारीचा (Hunger) सामना करावा लागत आहे. (Hunger is increasing in across globe food crisis in 2021)
हेही वाचा: जागतिक माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची घसरण, १४२ वरुन १५० स्थानी
अन्न असुरक्षा काय आहे ?
संयुक्त राष्ट्रसंघानुसार तीव्र अन्न असुरक्षा म्हणजे एखाद्या व्यक्तीला पुरेसं अन्न मिळत नाही. एफएओने म्हटले, दुष्काळात आणि मृताचे कारण हे उपासमारीच आहे. २०१६ मध्ये एफएओ, जागतिक अन्न कार्यक्रम आणि युरोपीय संघाद्वारा पहिला अहवाल प्रकाशित झाल्यानंतर ही संख्या सतत वाढत आहे. एफएओने म्हटले की २०२१ मध्ये वाढते युद्ध, हवामान बदल आणि आर्थिक संकटाचे मिश्रण आहे. यामुळे ५३ देशांमधील लोक प्रभावित झाले आहेत.
अहवालात युक्रेन युद्धाबाबत लक्ष नाही
अहवालात युक्रेनमधील युद्धाचा विचार केला गेलेला नाही. मात्र एफएओने म्हटले आहे, की खाद्य संकट असणारे देश आणि दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभ्या लोकांवर सर्वाधिक प्रभाव टाकतो. रशिया आणि युक्रेन कृषी उत्पादनांचे प्रमुख उत्पादक देश आहेत. ती कृषी उत्पादने निर्यात करतात. यात गहू आणि सूर्यफूलाच्या तेलासह इतर उत्पादनांचा समावेश आहे. युद्धामुळे मार्चमध्ये जागतिक खाद्य किंमती उच्चस्तरावर पोहोचले. युद्धामुळे जागतिक खाद्य यंत्रणातील त्रुटी समोर आल्याचे एफएओने म्हटले आहे.
हेही वाचा: PM मोदींच्या अन्न सुरक्षा योजनेमुळे गरिबीत होणारी वाढ टळली : IMF
२०२१ मध्ये उपासमारीचे ही कारणे होती
२०२१ मध्ये युद्ध आणि असुरक्षा २४ देशांमध्ये तीव्र उपासमारीचे कारण होते. यात १३९ लोक प्रभावित झाले. कोविडमुळे आर्थिक धक्के बसत गेले. यामुळे २१ देशांमध्ये ३०.२ मिलियन लोक प्रभावित झाले. दुसरीकडे आठ आफ्रिकन देशांमध्ये २३.५ मिलियन लोकांसाठी तीव्र अन्न असुरक्षा मुख्य कारण होते.
Web Title: Hunger Is Increasing In Across Globe Food Crisis In 2021
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..