Phone Hack : ‘ॲपल’च्या अलर्टमुळे राजकारण तापले

‘केंद्र सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून याप्रकरणी चौकशी देखील सुरू केली आहे.
Phone Hack
Phone Hacksakal

नवी दिल्ली - काही सरकार पुरस्कृत हल्लेखोर हे फोन हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा ‘अॅपल’ या कंपनीकडून देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप केला असून केंद्र सरकारने मात्र ते आरोप फेटाळून लावले आहेत. ‘अॅपल’ या कंपनीने दीडशे देशांसाठी अशा प्रकारची सावधगिरीची सूचना दिली असून ती अपूर्ण माहितीवर आधारित असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. यातील अनेक इशारे हे चुकीचे देखील असू शकतात, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे, असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले.

‘‘केंद्र सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून याप्रकरणी चौकशी देखील सुरू केली आहे. आधीच चौकशीचे आदेश देण्यात आले असून आम्ही या प्रकरणाच्या अगदी मुळापर्यंत जाऊ. ‘अॅपल’ला देखील या चौकशी प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे,’’ असे मंत्री वैष्णव म्हणाले. या कथित हेरगिरीच्याप्रकरणावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा, ‘आप’चे राघव चढ्ढा, ‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवेसी आणि शशी थरूर आदी नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दुसरीकडे कंपनीनेही ‘काही ग्राहकांना गेलेले संदेश म्हणजे सरकार पुरस्कृत हॅकिंग आहे असे म्हणता येणार नाहीत,’ असे स्पष्ट केल्याने संभ्रम वाढला आहे. ‘अशा प्रकारच्या धोक्याच्या संदेशाबाबत आपण माहिती देऊ शकत नाही,’ असेही कंपनीने म्हटले आहे.

आम्हाला दुसरे काम नाही का?

भाजपचे नेते रविशंकर प्रसाद आणि नलीन कोहली यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेत हेरगिरी शिवाय सरकारला दुसरे काही काम नाही काय? असा सवाल केला आहे. ‘तृणमूल’ च्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. याबाबत त्यांना संसदेच्या आचारसंहिता समितीसमोर म्हणणेही मांडायचे आहे. त्यांनी त्यांचा संसदेचा लॉगईन आयडी व पासवर्ड दुसऱ्याला दिल्याचे मान्य केले आहे. अशावेळी सरकारने हेरगिरी केल्याचा आरोप त्या कशा काय करू शकतात? स्वत:वर झालेल्या आरोपांवरून लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी अशाप्रकारचे निराधार आरोप केले जात असल्याचे कोहली यांनी सांगितले.

Phone Hack
Phone Hacked: तुमचा फोन हॅक झालाय? असं कळणार झटक्यात, जाणून घ्या

त्यांना देशाचा विकास दिसत नाही

‘‘जेव्हा विरोधी पक्षांकडे कोणतेही मुद्दे नसतात तेव्हा ते केंद्र सरकारवर हेरगिरीचा आरोप करतात. विरोधी नेत्यांनी केलेले आरोप निराधार आहेत. काही लोकांना टीका करण्याची सवयच लागली असून त्यांना देशाचा विकास दिसत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा ते सत्तेत असतात तेव्हा त्यांना केवळ कुटुंबीयच दिसत असतात. ‘ॲपल’ कंपनीच्या ज्या इशाऱ्याबद्दल सांगितले जात आहे तो इशारा त्यांनी दीडशे देशांसाठी दिला आहे.’’ असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com