Phone Hacked: तुमचा फोन हॅक झालाय? असं कळणार झटक्यात, जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

how to know my phone hacked or not

Phone Hacked: तुमचा फोन हॅक झालाय? असं कळणार झटक्यात, जाणून घ्या

Phone Hacked: हल्ली सर्व काही डिजिटल झालंय. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आलंय. त्यामुळे फोनशिवाय किंवा मोबाईलशिवाय माणसाचं आयुष्य अपुर्ण आहे.

फोन जसा दैनंदिन आयुष्याचा भाग बनलाय ज्यामुळे अनेक सोयी सुविधा सहज उपलब्ध होतात तसचं या फोनमुळे तुम्ही अडचणीतही येऊ शकतात विशेष म्हणजे तुम्ही सायबर क्राइमचे शिकार झाला तर... (how to know my phone hacked or not?)

हल्ली फोन हॅक होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे अशात फोनमध्ये असलेला डेटा, फोटो, व्हिडीओ याशिवाय आर्थिक व्यव्हार असुरक्षित झाले आहेत.

त्यामुळे फोन हॅक झाला तर त्वरीत ओळखून योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. पण फोन हॅक झाला, हे कसं ओळखायचं? चला तर जाणून घेऊया. ( how to know if your phone is hacked read story)

  • जर तुमचा फोन हॅक झाला तर तुम्ही सहजरित्या जाणून घेऊन शकता. ही हॅकींगची टेस्ट नाही तर लक्षण म्हणता येणार. मालवेअर किंवा फ्रॉड अॅप असेल तर तुमच्या मोबाईलची बॅटरी खूप स्पीडने कमी होणार.

  • कारण असे अॅप्स स्क्रीन बंद झाल्यावरही काम करतात आणि तुमचा डेटा चोरतात. ज्यामुळे तुमची बॅटरी सहज लवकर लो होते.

हेही वाचा: Tech Layoff : 2008 च्या मंदीच्या तुलनेत 2022 मध्ये अधिक लोकांनी गमावल्या नोकऱ्या

  • जर तुमचा फोन कालपर्यंत ठिक होता पण आज अचानक स्लो काम करायला लागला तर हे सुद्धा फोन हॅक होण्याचं लक्षण आहे. आपल्याला वाटतं की फोन हँग झालाय पण अनेकदा फोन हॅक सुद्धा होतो.

  • जर तुम्हाला वारंवार सोशल मीडियावरील अकांउटवर लॉग इनचे मेसेज येत असेल तर फोन हॅक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे ऑनलाईन अकाउंट्सला वारंवार चेक करा.

हेही वाचा: WhatsApp Hacks : व्हॉट्सअॅपशी संबंधित या युक्त्या तुम्हाला माहीत आहेत का ?

  • जर तुम्हाला वारंवार अनोळखी नंबर वरुन कॉल किंवा मेसेज येत असेल तर तुम्ही अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अनेकदा हॅकर्स तुमचा फोन कॉल किंवा मेसेजद्वारे हॅक करू शकतो.

  • एवढंच काय तर तुमचा फोन हॅक करुन हे हॅकर्स तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या मोबाईलमधीलसुद्धा डेटा चोरू शकतात.