अधिकारी बापाला पोलिस ऑफिसर मुलीचा कडक सॅल्युट; सोशल मीडियावर फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

photo

हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला असून या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरु आहे.

अधिकारी बापाला पोलिस ऑफिसर मुलीचा कडक सॅल्युट

सध्या सोशल मिडियावर काही क्षणांतच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. मग यामध्ये काही फोटोंचे कौतुक होते तर अनेकांवर टीकाही होते. असाच एक फोटो सध्या चर्चेत आला आहे. या फोटोने अनेकांच्या भावनिकतेला स्पर्श केला आहे. हा फोटो आहे, तो एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा. यात मुलगी आणि वडील दोघे एका मैदानावर ऑफिसरच्या वर्दीमध्ये उभे आहेत. या ऑफिसर मुलीने वडीलांना सॅल्युट केलेला फोटो क्लिक केला आहे. आणि हा फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरु असून लोकांतून याचे कौतुक होत आहेत.

हेही वाचा: 'वसुलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र...'

इंडो तिबेटियन पोलिस (ITBP) यांनी या फोटोला त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यामध्ये महिला पोलिस ऑफिसरने आपले वडील डीआयजी यांना सॅल्युट केला आहे. वडीलांनी या सॅल्युटचा स्विकार करुन तिला सलाम केला आहे. 'आयटीबीपी'ने 'गौरवशाली बापाला गौरवशाली मुलीचा सॅल्युट' या कॅप्शनसहित सोशल मिडीयावर हा फोटो पोस्ट केला आहे.

हेही वाचा: अफगाणकडे जाणारे भारताचे पाच हजार ट्रक का अडकलेत पाक सीमेवर? काय आहे हे प्रकरण?

यातून अशी माहिती मिळाली की, या महिला ऑफिसरचे नाव अपेक्षा निंबदिया असे असून त्या उत्तर प्रदेश येथील डेप्युटी एसपी म्हणून सेवा बजावत आहेत. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून त्यांनी डॉ. बी.आर आंबेडकर या अॅकडमीतून यूपी पोलिससाठी शिक्षण आणि तयारी केली आहे. तिच्यासोबत आई आणि बाबांचा आणखी एक फोटोही दिला आहे.

Web Title: Photo Viral Of Officer Daughter Salute To Officer Father In Uttar Pradesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..