वसुलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र...; राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'वसुलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र...'

काहीतरी कारणे, घटना आणि वक्तव्यांवरून एकमेकां विरोधात टोलेबाजी सुरु असते.

'वसुलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी, जनतेच्या पदरी मात्र...'

येऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा बॅंक निवडणुकांमुळे बऱ्याचवेळा सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांची सोशल मिडियावर टिप्पणी सुरु असते. काहीतरी कारणे, घटना आणि वक्तव्यांवरून एकमेकां विरोधात टोलेबाजी सुरु असते. वाढती महागाई, इंधन दरवाढ राज्यातील विविध प्रकल्पासांठी मंजूर झालेला निधी यावरून आता पुन्हा भाजपाने मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी ट्वीटद्वारे एका कार्टूनमधून ही टीका केली आहे.

हेही वाचा: समीर वानखेडेंचा सत्कार, NCB ऑफिसमध्ये येताना उधळली फुलं

ट्वीटमध्ये त्यांनी एक कार्टून प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, कामगारांना मिळालेला बोनस आणि वाढती महागाई यातील तफावत दर्शवली आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मंजूर झालेल्या निधी वाटपाचे चित्रही दिसत आहे. याला अनुसरुन 'वसूलीबाजीतून भरली स्वतःची तिजोरी आणि जनतेच्या पदरी मात्र वाढून ठेवली दरिद्री' असा खोचक' टोला त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. स्वत:ची तिजोरी फुल, जनतेची मात्र दिशाभूल असंही ते म्हटले आहेत.

दरम्यान, भाजपा आणि महाविकास आघाडीतील राजकीय नेतेमंडळी काही ना काही कारणाने एकमेकांवर सातत्याने निशाणा साधत असतात. आता नितेश राणे यांच्या या ट्वीटमुळे ठाकरे सरकार आणि मुख्यमंत्री काय प्रतिक्रीया देता याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Web Title: Nitesh Rane Criticized On Thackeray Government On Increase Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..