

Gang Rape survivor Attacked Again, Thrown Off Roof at Night
Esakal
बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चार महिन्यांपूर्वी सामूहिक अत्याचार झालेल्या तरुणीवर पुन्हा हल्ला करण्यात आलाय. दोन जणांनी तिला जबरदस्तीने घराच्या छतावर नेले. तिथे मारहाण केली आणि खाली फेकून दिले. या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर बेगुसरायच्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.