‘चांद्रयान-२’ने पाठविले फोटो

पीटीआय
Monday, 7 October 2019

‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरवर बसविण्यात आलेल्या उच्चक्षमतेच्या कॅमेऱ्याने टिपलेले चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रामध्ये लहान आकाराचे खड्डे आणि खडकाळ भाग दिसून येत आहे, असे इस्रोने केलेल्या ट्‌विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

लहान खड्डे, खडकाळ भागांचा समावेश असल्याची इस्रोची माहिती
बंगळूर - ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटरवर बसविण्यात आलेल्या उच्चक्षमतेच्या कॅमेऱ्याने टिपलेले चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रामध्ये लहान आकाराचे खड्डे आणि खडकाळ भाग दिसून येत आहे, असे इस्रोने केलेल्या ट्‌विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

‘इस्रो’ने म्हटले आहे की, ‘चांद्रयान-२’च्या ऑर्बिटनने ५ सप्टेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागाचे छायाचित्र घेतले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून शंभर किलोमीटर उंचीवरून ऑर्बिटरने हे छायाचित्र टिपले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील बोगुल्साव्हस्की विवराच्या परिसरातील हे छायाचित्र आहे. सुमारे १४ किलोमीटर व्यास असलेल्या या विवराची खोली ३ किलोमीटर ऐवढी आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे हे विवर आहे.  या छायाचित्रामध्ये लहान आकाराचे खड्डे आणि खडक दिसून येत असल्याचे इस्रोने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pics by chandrayaan 2