
लखनऊ- कुरानमधील 26 आयत हटवण्यासाठी शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी त्यांना विरोध वाढला आहे. याप्रकरणी शनिवारी रिझवी यांच्याविरोधात एफआयआरची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे मौलानांनी आपल्या समर्थकांसोबत रिझवी यांच्या घराच्या बाहेर निदर्शने केली. वसीम रिझवी यांनी याचिका दाखल करुन म्हटलंय की कुरानमधील 26 आयते दहशतवादाला प्रोत्साहन देतात. त्यामुळे ते हटवण्यात यावेत. भाजप नेते जीशान खान यांनी अनेक मौलानांना सोबत घेऊन कश्मिरी मोहल्ल्यात असणाऱ्या रिझवी यांच्या घराबाहेर 26 आयतांचे तिलावत (पठन) केले. जुन्या लखनऊमध्ये शनिवारी उशिरा रात्री महिलांनी रिझवी यांचे पोस्टर जाळले. दरम्यान, या प्रकरण मुस्लीम समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
मुस्लीम धर्मगुरुंनी केली कारवाईची मागणी
शिया आणि सुन्नी धर्म गुरुंनी रिझवी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. रिझवी यांनी कोट्यवधी मुस्लिमांच्या भावनांना ठेस पोहोचवली आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन देशातील मुस्लीमांच्या भावना भडकवण्याचं काम केलं आहे. शिया आणि सुन्नी धर्म गुरुंनी रिझवी यांनी दाखल केलीली याचिका फेटाळण्याची विनंती सुप्रीम कोर्टाने केली आहे.
रिझवी यांनी भावना भडकवल्या
ऐशबाग ईदहादचे इमाम मौलाना खालिस रशीद फरंगी महली यांनी म्हटलं की, कुरान-ए-पाक अल्लाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. कुरान कोणत्या व्यक्तीने नाही, तर पैगंबर मोहम्मद यांच्याकडून आली आहे. 26 आयतेच नाही तर कुरानमध्ये दिलेला एक शब्दही बदलला जावू शकत नाही. देशासह जगभरातील मुस्लिमांच्या भावना यामुळे भडकतील. इमाम-ए-जुमा आणि शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद नकवी यांनी वसीम रिझवी यांना इस्लामचा दुश्मन ठरवलं आहे. ते म्हणाले की, रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समुदायासोबत काही देणं घेणं नाही. ते मुस्लिम विरोध संघटनेचे एजेन्ट आहेत. वक्फ बोर्डची सीबीआय चौकशी सुरु आहे. त्यामुळे वसीम यांनी आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे कृत्य केलं आहे. त्यांना अटक करण्यात यावी.
ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ता मौलाना यासूब अब्बास म्हणाले की, कुरान-ए-पाक म्हणतं की ‘लकुम दिनकुम वलिया दीन’ म्हणजे तुमचा दीन तुमच्यासोबत, आमचा दीन आमच्यासोबत. मोहम्मद पैंगबरानंतर इमाम हजरत अली आणि सर्व 12 इमामांनी कुरानामध्ये एका शब्दाचाही बदल केला नाही. कुरान अल्लाचा ग्रंथ आहे, त्यामुळे यात बदल केला जाऊ शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.