सोज्वळ सायलीच्या हॉट सीनची जोरदार चर्चा; VIDEO व्हायरल

 sayali sanjeevs
sayali sanjeevs

मराठी चित्रपटसृष्टीमधील तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीवचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या 'काहे दिया परदेस' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. सध्या सायलीची शुभ मंगल ऑनलाईन या मालिकेतील शर्वरी नावाच्या मुलीच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. नुकताच मराठी चित्रपट 'झिम्मा'चा टिझर प्रदर्शित झाला. त्यातील सायलीच्या बॉल्ड सिनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. झिम्मा या चित्रपटाचा टिझर 'जागतिक महिला दिना' निमित्त प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात मराठी चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेवकर, क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव हे कलाकार या चित्रपटात काम करणार आहेत.

चित्रपटाच्या टिझरमध्ये सायलीचा एक बोल्ड सीन आहे. ज्यामध्ये ती आंघोळ करताना दिसत आहे. टिझरमधील या सीनची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. याआधी सायलीला प्रेक्षकांनी मालिकांमध्ये साडी किंवा ड्रेसमध्ये पाहिले आहे पण झिम्मा मधील सायलीच्या हा बोल्ड अंदाजाला पाहण्यास प्रेक्षक उस्तुक आहेत. या चित्रपटाचा टिझर सायलीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. टिझरला तिने असे कॅप्शन दिले की, 'झिम्मा सात बाई सात.. बायका सात! जिवाची सफर.. आता राणीच्या देशात!फेसबुक आणि यूट्युबवर दंगा घालून आता इंन्स्टाग्राम वर तुमच्यासाठी! बघा आणि नक्की कमेंट करा!'

झिम्मा चित्रपट  २३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. चित्रपटाच्या टिझरमधील 7 बायकांची धमाल मस्ती आणि 1 पुरूषाची उडणारी तारांबळ पाहण्यास प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com