Pilibhit Tiger Reserve: वीकेंडला जंगल सफारीचा प्लॅन? नेपाळ सीमेवरील हे जंगल आता अधिक संरक्षित; पर्यटकांसाठी काय बदलणार?

पीलीभीत व्याघ्र प्रकल्पाभोवती दोन किमीपर्यंत इको सेन्सिटिव्ह झोन; खाणकाम, प्रदूषणकारी उद्योग, मोठे जलविद्युत प्रकल्प आणि नवीन हॉटेल-रिसॉर्ट्सवर निर्बंध, वन्यजीवांच्या अधिवासाला कायदेशीर संरक्षण
pilibhit tiger reserve eco sensitive zone

The Central Government has declared the area around Pilibhit Tiger Reserve as an Eco Sensitive Zone to strengthen wildlife conservation.

Sakal

Updated on

उत्तर प्रदेशातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पीलीभीत व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराला अधिकृतपणे पारिस्थितिकदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन) घोषित केले आहे. यासंदर्भातील अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट्या, फिशिंग कॅट, लेपर्ड कॅट, बाराशिंगा, चितळ, सांबर, अस्वल, मगर आणि घडियाल यांसारख्या वन्यजीवांच्या अधिवासाला अधिक कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com