मोठा अनर्थ टळला! वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळं दोन मंत्र्यांचा वाचला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Helicopter

वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळं दोन मंत्र्यांचा जीव वाचला आहे.

मोठा अनर्थ टळला! वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळं दोन मंत्र्यांचा वाचला जीव

बंगळुरु : कर्नाटकातील (Karnataka) वैमानिकाच्या (Pilot) प्रसंगावधानामुळं दोन मंत्र्यांचा जीव वाचलाय. येथील एचएएल विमानतळावर (HAL Airport) ही घटना घडलीय. तांत्रिक दोष निर्माण झाल्याने हेलिकॉप्टर (Helicopter) न उडवता तिथंच थांबून वैमानिकानं मंत्र्यांचा जीव वाचवलाय. वैमानिकाच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

उद्योगमंत्री मुरुगेश निराणी (Murugesh Nirani) आणि नगर प्रशासनमंत्री एमटीबी नागराज (MTB Nagaraj) यांना वैमानिकामुळं जीवदान मिळालंय. हे दोन्ही मंत्री म्हैसूरमधील हुणसूर रस्त्यावर कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाच्या (Karnataka University) पदवीदान समारंभात आयोजित रोजगार अदालतीत भाग घेण्यासाठी निघाले होते.

हेही वाचा: 'बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय'

दरम्यान, खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर त्यांनी आरक्षित केलं होतं. हेलिकॉप्टर सुरू केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याचं वैमानिकाला आढळलं. त्यानं हेलिकॉप्टर तिथंच थांबवलं. पर्यायी हेलिकॉप्टर शोधण्याचा सल्ला त्यानं मंत्र्यांना दिला. त्यानंतर दोन्ही मंत्री वाहनाने गेले. त्यामुळं मोठा अनर्थ टळला.

Web Title: Pilot Saved The Lives Of Murugesh Nirani And Mtb Nagaraj At Bangalore Karnataka

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KarnatakaAirport
go to top