UP चं केरळमध्ये रुपांतर झाल्यास काय होईल? एका मुख्यमंत्र्याचा दुसऱ्यावर पलटवार

pinarayi vijayan replied yogi adityanath if uttar pradesh converted into kerala remark
pinarayi vijayan replied yogi adityanath if uttar pradesh converted into kerala remarkGoogle

नवी दिल्ली : आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (UP Election 2022) पहिल्या टप्प्यात 58 जागांवर मतदान होत आहे. त्यानिमित्त आज सकाळीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. तुमचे एक मत उत्तर प्रदेशचे भविष्य ठरवणार आहे. नाहीतर उत्तर प्रदेशचे काश्मीर, केरळ, बंगाल व्हायला वेळ लागणार नाही, असं योगी म्हणाले होते. त्यावर आता केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन (Kerala CM Pinarayi Vijayan) यांनी योगींवर जोरदार पलटवार केला आहे.

pinarayi vijayan replied yogi adityanath if uttar pradesh converted into kerala remark
उत्तर प्रदेश : जात समीकरणावरच अलीगडची निवडणूक होण्याची शक्यता

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भीतीनुसार उत्तर प्रदेशचं केरळमध्ये रुपांतर झालं, तर तिथे उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा, समाजसेवा, उच्च दर्जाचं राहणीमान या सर्व सुविधांचा जनतेला लाभ घेता येईल. एक सामंजस्यपूर्ण समाज असेल ज्यामध्ये धर्म आणि जातीच्या नावावर लोकांची हत्या होणार नाही, असं पिनाराई विजयन म्हणाले.

भाजप उत्तर प्रदेशच्या व्हेरिफाईड हँडलवरून जारी करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये योगी आदित्यनाथ मोठ्या निर्णयाची वेळ आली असल्याचे सांगत आहेत. या ५ वर्षांत खूप काही घडले. चुकलो तर केलेली मेहनत वाया जाईल, याची काळजी घ्या, असेही त्यांनी जनतेला सांगितले. यावेळी यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही, असं योगी म्हणाले होते.

यूपीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाअंतर्गत आज पश्चिम यूपीच्या 58 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शामलीमध्ये तीन, मुझफ्फरनगरमध्ये सहा, बागपतमध्ये तीन, गाझियाबादमध्ये पाच, हापूरमध्ये तीन, गौतम बुद्ध नगरमध्ये तीन, बुलंद शहर, मेरठ आणि अलिगड, मथुरा येथे प्रत्येकी सात, आग्रामध्ये नऊ आणि मथुरामध्ये पाच जागांचा समावेश आहे. या जागांवर शेतकरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांची नाराजी सत्ताधारी भाजपसाठी काही अडचणी निर्माण करू शकते, असे मानले जात आहे. यूपी निवडणुकीत भाजपशिवाय सपा, बसपा, काँग्रेस, आम आदमी पार्टीनेही उमेदवार उभे केले आहेत. मात्र मुख्य लढत भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यात असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com