Pink Leopard | काय सांगता, गुलाबी बिबट्या...फोटो पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pink leopard

जंगलात पहिल्यांदाच गुलाबी बिबट्या दिसला आहे.

काय सांगता, गुलाबी बिबट्या...फोटो पाहाच

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

जंगलची सफारी करायची म्हणलं काहींना आवडते तर काहींना नाव ऐकताच भिती वाटते. म्हणजे जंगलाचे जगच खरोखरच वेगळे आहे. जंगलात विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी येथे राहतात. परंतु जंगलातील काही प्राणी इतके दुर्मिळ असतात, की त्यांना शोधणे अवघड बनूण जाते. या दिवसामध्ये असाच एक दुर्मिळ प्राणी जंगलात दिसला आहे. जो बराच दिवस कुणाच्या नजरेस पडला सुध्दा नाहियेय.

हेही वाचा: आदिवासी भागातील गुलाबी गाव पाहिलंत का ?;पाहा व्हिडीओ

एका माहितीनुसार, जंगलात पहिल्यांदाच गुलाबी बिबट्या (Pink Leopard) दिसला आहे. ज्याचा लोकांनी कधी फारसा विचार केलाही नसेल. हा बिबट्या दक्षिण राजस्थानच्या अरवली डोंगराळ भागात रणकपूर परिसरात दिसला आहे. एका अहवालानुसार, यापूर्वी 2012 आणि 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेत गुलाबी बिबट्या दिसला होता. भारतात पहिल्यांदा पांढरा बिबट्या 1910 मध्ये दिसला होता, तेव्हापासून फक्त सामान्य आणि काळा बिबट्या दिसत होता.

ही माहिती समजताच, सगळीकडे चर्चेला उधाण आलं होतं. यावेळी रणकपूर आणि कुंभलगढच्या लोकांनी असेही सांगितले की, त्यांनी त्यांच्या भागात एक मोठी मांजर बरेच वेळेस पाहिली आहे, ज्याचा रंग गुलाबी आहे. उदयपूरचे वन्यजीव संरक्षक आणि छायाचित्रकार हितेश मोटवानी यांनी हे फोटो क्लिक केल्याचे सांगितले. हे फोटो क्लिक करण्यासाठी हितेश चार दिवस प्रवास करत होते. तेव्हा त्यांना गुलाबी बिबट्या दिसला आहे. आनुवंशिकतेमुळे बिबट्याचा रंग गुलाबी होतो. पण काही ठिकाणी गुलाबी बिबट्या क्वचितच प्रमाणातच दिसतात.

loading image
go to top