

uttarakhand chamoli tunnel accident update
esakal
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील विष्णुगाड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाधीन बोगद्यात गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता दरड कोसळून पाणी आणि गाळ शिरल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १२ जणांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.