इटलीच्या 600 कंपन्यांमध्ये भारतातील 50 हजार कर्मचारी कामाला; परराष्ट्र मंत्र्यांची माहिती I Luigi Di Maio | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Italian FM Luigi Di Maio

'आमच्या सरकारला भारत-इटली औद्योगिक स्तरावर सहकार्य वाढवायचं आहे.

इटलीच्या 600 कंपन्यांमध्ये भारतातील 50 हजार कर्मचारी कामाला : लुइगी माइओ

भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे परराष्ट्र मंत्री लुइगी दी माइओ (Italian FM Luigi Di Maio) यांनी शुक्रवारी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेतली. बैठकीनंतर गोयल म्हणाले, 135 कोटी भारतीयांचं जग एका चांगल्या भविष्याची वाट पाहत आहे. भारत कदाचित, संपूर्ण जगात सर्वात मोठ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देईल. आज आम्ही $3 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेवरून पुढील 10 वर्षांत $10 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेकडं जात आहोत, असं त्यांनी नमूद केलं.

यावेळी इटलीचे परराष्ट्र मंत्री माइओ म्हणाले, आमच्या सरकारला भारत-इटली औद्योगिक स्तरावर सहकार्य वाढवायचं आहे. आजची बैठक आमच्या धोरणात्मक भागीदारीला आकार देण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे आमच्या व्यावसायिक समुदायांमधील घनिष्ठ व्यावसायिक आणि औद्योगिक संबंधांचं सूचक आहे. भारत आणि इटली हे गतिशील आर्थिक सहकार्य अनुभवत आहेत. अनेक इटालियन कंपन्या इटालियन कंपन्या (Italian Companies) भारतीय बाजारपेठेकडं वळत आहेत.

हेही वाचा: पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेतील व्यक्ती इम्रान खान? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

भारत-इटली बिझनेस राऊंडटेबल (India-Italy Business Roundtable) दरम्यान माइओ यांनी ही माहिती दिलीय. ते पुढं म्हणाले, कोरोना विषाणूमुळं (Corona Virus) आंतरराष्ट्रीय व्यापारात घट झाल्यानंतर भारत आणि इटलीनं आता केवळ 2019 मध्ये गाठलेल्या द्विपक्षीय व्यापाराचा आकार परत मिळवला नाही, तर 2021 मध्ये दोन्ही देशांनी 10 अब्ज युरोपेक्षा जास्त उलाढाल गाठण्याची अपेक्षा केलीय. आपल्या देशातील 600 हून अधिक कंपन्यांनी भारतात आपलं अस्तित्व प्रस्थापित केलंय. प्रामुख्यानं दिल्ली, मुंबई आणि पुणे इथं आहेत आणि त्यांच्याकडं 50,000 पेक्षा जास्त स्थानिक कर्मचारी आहेत. त्यांची जागतिक उलाढाल 5 अब्ज युरो आहे. भारत आणि इटली या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऊर्जा संक्रमण आणि हरित अर्थव्यवस्थेवर कर शिखर परिषद आयोजित करतील. हा कार्यक्रम दिल्लीत होणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. आमच्या दोन्ही पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2021 मध्ये रोममध्ये सुरू केलेल्या धोरणात्मक सहकार्यासाठी संस्थात्मक आराखडा तयार करण्याचं आमचं ध्येय आहे. भारत आणि इटलीमधील संस्था, विद्यापीठे, संशोधन केंद्रे आणि कंपन्यांमधील प्रभावी संवादाला प्रोत्साहन देणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: Piyush Goyal And Italian Fm Luigi Di Maio Attended India Italy Business Roundtable In New Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Piyush GoyalItaly
go to top