पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेतील व्यक्ती इम्रान खान? व्हायरल व्हिडिओमुळं पाकिस्तानात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imran Khan

आता इम्रान खान समलिंगी संबंधांवरून वादात सापडले आहेत.

पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेतील व्यक्ती इम्रान खान? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ

पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना गेल्या महिन्यात पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली होती. पंतप्रधान पद गेल्यानंतरही इम्रान यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. आता इम्रान खान समलिंगी संबंधांवरून वादात सापडले आहेत. पाकिस्तानात हल्ली अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी सध्या एक गे सेक्स व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे. या अश्लील व्हिडिओत एका व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असणारा इसम इम्रान खान असल्याची चर्चा पाकिस्तानात होत आहे. मात्र, इम्राननं या व्हिडिओंना फेक असल्याचं म्हटलंय.

दरम्यान, इम्रान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफची (पीटीआय) सोशल मीडिया विंग हे व्हिडिओ समोर येण्यापूर्वीच डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतल्याच कळतंय. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांनी स्वतःच ईदनंतर त्यांचं चारित्र्या हनन होऊ शकतं, असं म्हटलं होतं. इम्रानचे काही अत्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ कधीही समोर येऊ शकतात, असं अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी स्पष्ट केलंय. ज्येष्ठ पत्रकार जफर अब्बास नकवी म्हणाले, हे व्हिडिओ रिलीज किंवा लीक होण्यासाठी तयार आहेत आणि इम्रान खान यांना याची माहिती आहे. पुढं नकवी म्हणाले, ‘अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे की, इम्रान यांचे 7 किंवा 8 व्हिडिओ आहेत आणि दोन ऑडिओ टेप्स आहेत. इम्रान यांचे सरकार पडल्यानंतर लगेचच हे व्हिडिओ प्रसिद्ध केले जाणार होते. परंतु, त्यावेळी रमजानचा पवित्र महिना सुरू होता. त्यामुळे ते प्रसिद्ध केले गेले नाहीत. मात्र, आता हे व्हिडिओ कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होऊ शकतात.’

हेही वाचा: मुख्यमंत्री बनविण्यासाठी माझ्याकडे मागितले 2500 कोटी; भाजप आमदाराचा दावा

एका मीडिया रिपोर्टनुसार, इम्रानच्या 7 किंवा 8 व्हिडिओंपैकी 3 व्हिडिओ त्याच्या बनीगाला येथील घरात बनवले गेले आहेत. त्यापैकी एक व्हिडिओ हा इम्रान यांचं सरकार पडणार होतं आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना बनवला गेलाय, असं जफर नक्वी यांनी इम्रान यांच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय. काही महिन्यांपूर्वी मध्यरात्री एका महिलेला चार्टर फ्लाइटनं अचानक लंडनला का पाठवण्यात आलं, याचं स्पष्टीकरण ज्येष्ठ पत्रकार इम्रान शफकत यांनी इम्रान यांच्या पक्षातील नेत्यांकडं मागितलं आहे. या महिलेचे पीटीआयच्या अनेक मंत्र्यांशी संबंध असल्याचं बोललं जातंय. ही महिला गरोदर होती आणि तिचा गर्भपात लंडनमध्ये झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: राज्यात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका?

आता इम्रान खान समलिंगी संबंधांवरून वादात सापडले आहेत. पाकिस्तानात हल्ली अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी सध्या एक गे सेक्स व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे. या अश्लील व्हिडिओत एका व्यक्तीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असणारा इसम इम्रान खान असल्याची चर्चा पाकिस्तानात होत आहे. मात्र, इम्राननं या व्हिडिओंना फेक असल्याचं म्हटलंय. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी टिकटॉक स्टार हरीम शाहचं (Hareem Shah) नाव चर्चेत होतं. इम्रान खान व्यतिरिक्त गृहमंत्री शेख रशीद आणि इतर अनेक नेत्यांसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.

Web Title: Imran Khan Having Relationship With Man Captain Frightened By Video Leak In Pakistan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pakistanimran khan
go to top