ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी: पियुष गोयल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

 डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. पासपोर्टसारखी जटल वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्यात मुळें यांचे मोठेयोगदान आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल (ता.28) व्यक्त केले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन काल ता(28) येथील संसदभवनाच्या प्रांगणात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 

नवी दिल्ली- डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. पासपोर्टसारखी जटल वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्यात मुळें यांचे मोठे योगदान आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल (ता.28) व्यक्त केले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन काल ता (28) येथील संसदभवनाच्या प्रांगणात झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले की, मुळे हे कोल्हापूर सारख्या ग्रामीण भागातून येऊन परराष्ट्र सेवेत रूजू झाले, त्यांचा जीवनाचा संघर्ष हा आजच्या तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. अवघ्या एक वर्षात पावणे तीनशेपेक्षा जास्त पासपोर्ट सेवा केंद्र देशात उभे करून त्यांनी भारतीय प्रशासनासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री. गोयल व विचारवंत आणि संसद सदस्य कुमार केतकर यांचे हस्ते  झाले. पासपोर्ट मॅन आफ इंडिया व अन्ड द जिप्सी लर्नड टू फ्लाय अशी त्यांच्या या दोन पुस्तकांची नावे आहेत.

याप्रसंगी बोलताना मुळे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील लाट सारख्या खेडे गावातून मी जेव्हा प्रथमच दिल्लीत आलो. तेंव्हा टाय व बुट कश्या पध्दतीने वापरावेत, हे सुध्दा मला माहिती नव्हते परंतु देश सेवा करायची आहे या प्रेरणेने जगभर नोकरीच्या निमित्ताने फिरलो. देशाच्यासेवेसाठी एक शेतकरी वर्गातील मुलगा परराष्ट्र सेवेत प्रचंड कार्य करू शकतो, याचा अभिमान मला आहे. तसेच, याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. त्याचबरोर, खासदार कुमार केतकर यांनीही मुळे यांना शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: piyush goyal express about on Dyaneshwar mule on his Book inauguration