esakal | Monsoon Session: भाजपकडून राज्यसभेचे नेते पीयुष गोयल; राहुल गांधी लोकसभा नेतेपदी?
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi

Monsoon Session: भाजपकडून राज्यसभेचे नेते पीयुष गोयल; राहुल गांधी लोकसभा नेतेपदी?

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : संसदेच्या मॉन्सून सत्राची सुरुवात होण्याआधीच काँग्रेस आणि भाजप दोन्हीही पक्ष मोठा निर्णय घेऊ शकतात. यामध्ये काँग्रेस पक्ष अधीर रंजन चौधरी यांच्या जागी राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये आपला नेता बनवू शकते, अशा चर्चा सुरु आहेत. तर भाजपने पीयूष गोयल यांना राज्यसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी देऊ केली आहे. 19 जुलैपासून संसदेचं मॉनसून सत्र सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

थावरचंद गहलोत यांना कर्नाटकच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिल्यानंतर राज्यसभेमधील ही जागा रिकामी झाली आहे. त्या जागी पीयूष गोयल यांना संधी दिली गेली आहे. दुसरीकडे काँग्रेस येत्या 48 तासांमध्ये मोठा निर्णय घेऊ शकते, अशा चर्चा आहेत. मात्र, काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेमध्ये सध्यातरी पक्षनेता पदामध्ये बदल होणार नाहीये. या सत्रामध्ये सुद्धा लोकसभेमध्ये अधीर रंजन चौधरी हेच काँग्रेसचे पक्षनेते असतील.

हेही वाचा: Maharashtra Unlock : राज्यातील निर्बंध शिथिल होणार?

काल निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीवेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी देखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होत्या. प्रशांत किशोर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा, के सी वेणुगोपाल इतके जण या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक सुमारे एक तास सुरु होती.

या बैठकीत पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादाबद्दल कसलीही चर्चा झाली नाहीये. मात्र, आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसंदर्भातील दृष्टीकोन प्रशांत किशोर यांनी या बैठकीत मांडला. शरद पवार यांना यूपीएच्या अध्यक्षपदी निवडण्याची कसलीही चर्चा या बैठकीत झाली नसल्याचंही काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितलंय.

loading image