esakal | धार्मिक स्थळांबाबत ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; १ जूनपासून...

बोलून बातमी शोधा

Mamata_Banerjee

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी २५ मार्चला देशव्यापी लॉकडाउन घोषित करण्यात आले होते.

धार्मिक स्थळांबाबत ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; १ जूनपासून...
sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : देशभरात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यापासून पश्चिम बंगालही वाचू शकले नाही. उलट बंगालला तर महाचक्रीवादळ अम्फानचाही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

योगी सरकारचे घुमजाव; कामगार नेण्यासाठी परवानगीची गरज नाही

येत्या १ जूनपासून बंगालमधील सर्व धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. मात्र, या धार्मिक स्थळांमध्ये एका वेळेस फक्त १० जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच राज्यातील चहा आणि तागाशी संबंधित सर्व उद्योगही पूर्वीप्रमाणे सुरू होतील. सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयेही पूर्ण क्षमतेसह उघडली जातील. ३१ मे ला लॉकडाउनचा चौथा टप्पा समाप्त होत असल्याने त्यांनी हा निर्णय शुक्रवारी (ता.२९) जाहीर केला. 

एअर इंडिया कर्मचारी संघटनांनी मागितले ५०,००० कोटींचे आर्थिक पॅकेज

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी (ता.२८) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाउनशी संबंधित विषयांवर चर्चा केली. ३१ मे रोजी लॉकडाउनचा चौथा टप्पा पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी ३१ मे नंतर काय रणनीती ठरवावी, याबाबतही चर्चा झाली. 

स्पेक्ट्रम लिलावामुळे दूरसंचार क्षेत्रावरील कर्ज वाढण्याची शक्यता

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी २५ मार्चला देशव्यापी लॉकडाउन घोषित करण्यात आले होते. त्यानंतर त्यामध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली. ३१ मे नंतर लॉकडाउन वाढविणे गरजेचे वाटते का? याबाबतही शहा यांनी मुख्यमंत्र्यांकडून मते जाणून घेतली तसेच सूचनाही मागविल्या असल्याची माहिती गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप