esakal | लोकशाही संस्थांवर नियोजनबद्ध हल्ले; काँग्रेस नेते राहुल यांची केंद्र सरकारवर टीका

बोलून बातमी शोधा

तुतिकोरीन (तमिळनाडू): कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी प्रचाररॅलीदरम्यान समर्थकांना अभिवादन केले.}

देशातील लोकशाही मार्गाने चालणाऱ्या संस्था तसेच माध्यमांवर मागील सहा वर्षांमध्ये नियोजनबद्धरीतीने हल्ले घडवून आणले जात आहेत. हे काम केंद्रातील भाजपचे सरकार आणि संघाच्या माध्यमातून केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनला घाबरतात, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज केली.

लोकशाही संस्थांवर नियोजनबद्ध हल्ले; काँग्रेस नेते राहुल यांची केंद्र सरकारवर टीका
sakal_logo
By
पीटीआय

तुतिकोरीन - देशातील लोकशाही मार्गाने चालणाऱ्या संस्था तसेच माध्यमांवर मागील सहा वर्षांमध्ये नियोजनबद्धरीतीने हल्ले घडवून आणले जात आहेत. हे काम केंद्रातील भाजपचे सरकार आणि संघाच्या माध्यमातून केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनला घाबरतात, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज केली. महाविद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांच्या संमेलनामध्ये ते बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील संस्थात्मक संतुलन नष्ट करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करतो आहे.  लोकशाही एका धक्क्यामध्ये मरत नसते ती हळूहळू मरू लागते. सध्या केंद्र सरकार हे देशामध्ये स्वार्थी भांडवलशाहीला प्रोत्साहन देते आहे. 

राहुल म्हणाले

  • मोदी घाबरट असल्याचे चीनला ठावूक
  • देस्पांगमधील जमीन परत मिळणार नाही
  • मोदी आपली जमीन परत देऊ शकत नाहीत
  • भविष्यात चीन लडाखमध्ये थांबणार नाही
  • २०१३ मध्ये आपण चीनला रोखले होते

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीन थांबणार नाही
चीनने रणनितीकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणी ताब्यात घेतली होती. सर्वप्रथम त्यांनी डोकलाममध्ये चाचपणी केली होती. यावर भारताने काहीही कारवाई केली नसल्याचे पाहून त्यांनी हीच रणनीती लडाखमध्ये देखील वापरली, आता अरुणाचल प्रदेशमध्ये देखील याची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती राहुल यांनी व्यक्त केली. 

Edited By - Prashant Patil