Uttarakhand tourist safety and advisory
Sakal
how to plan Uttarakhand New Year trip: नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेकजण हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंडच्या डोंगराळ भागांत जाण्याचे नियोजन करतात. शिमला, मनाली, मसुरी आणि नैनिताल यांसारख्या शहरांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते. परंतु, तुमचा हा आनंद विरजण पडू नये म्हणून दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत.