
नवी दिल्ली: ‘‘पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळणे ही देशाशी गद्दारी आहे,’’ अशी टीका आम आदमी पक्षाचे(आप) नेते अरविंद केजरीवाल केली. यावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. ‘‘पाकसोबत सामना आयोजित करण्याची काय गरज होती? सामना व्हावयास नको, असे सारा देश म्हणत आहे.